Sunday, October 19, 2025
Homeबातम्यामहत्त्व जात पडताळणी प्रमाणपत्राचं

महत्त्व जात पडताळणी प्रमाणपत्राचं

महत्वाच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना, निवडणूक लढवताना, सरकारी नोकरी आणि अन्य काही महत्वाच्या प्रसंगी जी काही महत्वाची प्रमाणपत्रे लागतात, त्यातीलच एक अत्यन्त महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे जात पडताळणी प्रमाण पत्र होय. ऐनवेळी ते नसलं तरी पूर्ण करिअरचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

या प्रमाणपत्राचं महत्व ओळखून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन मित्र सामाजिक प्रतिष्ठानच्यावतीने कार्याध्यक्ष विनोद साडविलकर यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र मार्गदर्शन व जनजागृतीचे सत्र साकीनाका येथील गुरुकुल क्लासेसमध्ये नुकतेच आयोजित केले होते.

शासनाने सर्व ३६ जिल्ह्यात जात पडताळणी समिती बनविली असून नागरिकांनी कोठल्याही मध्यस्थाशिवाय शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन अनिल गलगली यांनी याप्रसंगी केले.

श्री गलगली म्हणाले की, जात पडताळणी महत्वाची असून यामुळे खोटी जात प्रमाणपत्र बनवून गैरफायदा घेणाऱ्या लोकांचे बिंग फुटत आहे. त्यामुळे प्रत्येकाने जात पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे.

श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी तथा मुख्य समन्वयक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जाहीर आवाहन केले आहे. वर्ष  2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र, पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर सामान्यतः 3 महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र बाबत समिती निर्णय घेते.

वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थ्यी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये म्हणून आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. अँड. कैलास आगवणे, बाबू बत्तेली यांनीही उपयुक्त माहिती दिली. यावेळी रत्नाकर शेट्टी, शैलेश सिंह, अजीज खान, मिलिंद पुजारी उपस्थित होते.

अशाप्रकारचा अतिशय उपयुक्त उपक्रम आयोजित केल्याबद्दल श्री विनोद साडविलकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ईतर जिल्ह्याच्या ठिकाणी अशी शिबिरे होण्याचीही नितांत गरज आहे.

– देवेंद्र भुजबळ. 9869484800.

Devendra Bhujbal
Devendra Bhujbalhttps://newsstorytoday.com
Contact Me : +919869484800 Mail Me : devendrabhujbal4760@gmail.com
RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. सुंदर मुद्दा मांडला आहे. अशी मार्गदर्शन शिबिर होणे आवश्यक आहे. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप