कोल्हापूर येथील “आभाळमाया” या सामाजिक व शैक्षणिक संस्थेने नुकतेच कोल्हापूर येथे विविध जिल्ह्यातून वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या कामगारांच्या मुलांना स्वेटर, ब्लॅंकेट, खेळाचे व शैक्षणिक साहित्य, खाऊ देत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
या वीटभट्टी कामगारांच्या मुलांना कडाक्याच्या थंडीत पंचगंगा नदीकाठी झोपड्यांमध्ये कुडकुडत रात्र काढावी लागते. हे लक्षात घेऊन आभाळमाया संस्थेच्या अध्यक्षा सौ. लक्ष्मी पाटील यांनी हा उपक्रम राबविला.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0005-1024x681.jpg)
आभाळमाया संस्था अनाथ मुले, ऊसतोड कामगार मुले, वीटभट्टी कामगार मुले, वृद्धाश्रमातील वृद्ध यांच्याकरिता संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाद्वारे समाजभान जपत आदर्श कार्य करत असून समाजातील दानशूर व्यक्तींना अशा मुलांना मदत करण्याची गरज असल्याचे संस्थापिका अध्यक्षा लक्ष्मी पाटील यांनी सांगितले.
![](https://newsstorytoday.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0003-1024x681.jpg)
या उपक्रमासाठी वीटभट्टी मालक अरविंद मते, सचिन मते, निवृत्त डी वाय एस पी सुनीता नाशिककर कुलकर्णी मॅडम यांचे सहकार्य लाभले.
यावेळी आभाळमाया संस्थेचे पदाधिकारी बाजीराव पाटील,विशाल कुंभार, अमित संकपाळ, सुशांत डाफळे, सपनाज मुलाणी, सविता पोतदार, विद्या जाधव, संगीता पाटील, रेश्मा तांबोळी, शुभांगी सुतार, अर्चना कोराणे, प्रिया वारके, केतकी पाटील, सुयश पाटील, दर्श वारके, सुदेश पाटील, रुपेश घाटेघस्ती, अभिषेक शिंदे उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800