Wednesday, March 12, 2025

Rose Day

एक Rose Day-असाही !!” 😁

ज्येष्ठ नागरिकांनीही करावा की साजरा Rose Day !😀👇

‘सकाळ झाली, भैरू उठला’ वाल्या 😉 स्टाईलमधली ती सकाळ !

‘घर दोघांचेsss
घरकुल पाखरांचेsss’

जवळजवळ ‘ताss र सूरात’ रेडिओ गात होता.

“ती ‘सूर्यालाही जाग‘ आणेलशी आवाजाची रेंज कमी करणारे का कोणीss ?😮

कीचनमधून रेडिओपेक्षाही वर्च्या पट्टीत आवाज लागला शुभांगीचा !

वास्तविक ‘कोणीss’ म्हणायला, घरात शुभांगी नि तिचे ‘अहो’-शशिकांत, ह्यांच्याशिवाय दुसरं ‘कुण्णी सुध्दा’ नव्हतं.
पण..
पेपरातल्या अग्रलेखात डोकं खुपसलेला शशिकांत ‘ढिम्म’ हलला नाही.

खरं म्हणजे, ‘पुरेपूर चिडचिड’ भरल्या स्वरातल्या शुभांगीच्या बोलण्याचा ‘रोख’ यथायोग्य पोचला होता शशिपर्यंत, तरीदेखिल..

“कोण आहे रेss तिकडे ? हे एवढं हल्लकंसं काम करून टाका बरं”😛

“कोण असणारेss? 🤨तिकडेही नाही, ना इकडेही !! ते गाण्यात म्हणतायत तसचै, ‘घर दोघांचे’ !! म्हणजे, घरकुल पाखरांचं आहे अजूनही ! पण…
‘भविष्याचा वेध’ घेत पाखरं गेल्येत उडून केव्हाsची !! आता ‘एवढं हल्लकं’ काम करायला तुमचा ‘जड’ देहच हलवावा लागणारे” !😞

“जराss मी पेपर वाचीन म्हटलं तर बघवत नाही तुला ! काहीतरी खुसपट काढतेसच !!”

“जराss😲 ! ‘हे वृत्तपत्र… ह्यांनी …इथे छापून …इथ्थेच प्रसिध्द केलं’ पर्यंतचं तुमचं वाचन चाल्लेलं असतं
ते म्हंजे ‘जराsss’?
कम्मालै !! उलट त्यामानानं माझं काम ‘जरासं’ आहे, पण नईss, लक्षात कोण घेत्तंय ?”

“तू उभीच आहेस नं ?
मग जरा चार पावलं पुढे होऊन कर की आवाज कमी रेडिओचा”

“कित्ती मतलबी असता हो तुम्ही ‘नवरे’ लोकं !!
एरवी, ‘चार पावलं मागे घेणारी I mean, back foot वर जाणारी बायको प्रिफर करता तुम्ही ! 😏”

लोकं म्हणतात घरात दोघ्घंच दोघं असणारे ‘एल्डर्ली पिपल’ छोट्या छोट्या कारणांवरूनही ‘फिस्कारत’ असतात. परंतु इथे सग्गळंच वेगळंय ! गेले अनेक महिने (कदाचित् वर्षही उलटलं असेल) ‘शांततापूर्ण’ धोरण (‘हो ला हो’ किंवा ‘तू म्हणशील तसं‘ टाईप्स😄) अंगिकारलेल्या ‘शुभां’गीचा ह्या ‘शुभ’सकाळी, आज काय हा मूडै ?🤔

अशा विचारात पडलेला शशिकांत तसा थोडासा खूशच झाला. बऱ्याच महिन्यांनी घरातलं हवामान बदलल्यासारखं वाटलं.
आता ‘भांडणाचे वारे’ वाहू लागलेच आहेत तर …😃

“आम्हा जोश्यांच्या घरी लग्गेचच ‘उभ्या-उभ्या’ कामं झटकन् उरकून टाकायची पध्दत आहे, त्यात ‘पावलांचा’ काय एवढा इश्यू करायचाय ?”

“ घ्याss ! आता ‘उभ्या-उभ्या’चा वेदान्त कोण सांगतंय पहा ! तेही ‘बूड’ जर्रा म्हणून न हलवता 😲
अहो, अजून एक गोष्ट निक्षून सांगते ! लग्नाला ४३ वर्ष उलटून गेली आपल्या. ते लक्षात नसेलच म्हणा !! एकेका घरी पहा, नवरे लोकांना सग्गळ्या तारखा लक्षात असतात अगदी आजच्या Rose Day सह !
नि नविन गिफ्टस्, डिनर पार्टी…….’ वर्षाव नुस्ता !!😔😔😔

मी म्हणते , तेही जाऊन्दे, ते ॲक्सेप्टेड !!😊
So,
माहेरी राह्यलेय त्यापेक्षा जवळ जवळ ‘दुप्पट’ वर्ष ‘जोशां’कडे काढल्येत मी !
तेव्हा आता ‘आम्हा जोशांची’ मातब्बरी काssही उरलीये का ?”🤓🤓

थाडकन् पेपर बंद करून शशिकांत उठलाच.
(‘अर्रे , नाही रहात लक्षात तारखा एखाद्याच्या’ पण… शुभांगीनं ‘दुखती नस पे….’)

“Oh, no ! आज ७ तारीख, सकाळीच, चंदूला फोन करायचं ठरल होतं पण नेमका मोबाईल गटांगळ्या खातोय. जरा चार्जर घेतो गं तुझा !माझ्या टॅब नि पॅड मध्ये दुसरे दोन चार्जर्स अडकलेत.”

“नाही हं ! मला मोबाईल फुल्ल चार्ज्ड हवाय.“

“शुभा, अगं 67% दाखतोय तुझा मोबाईल. इतका frequently नसतो चार्ज करायचा गं बाई”

“घ्याss, आता चार्जिंग ही तुमच्या मतानुसार करायचंय मी,😏 का म्हणून ??? घरोघरी, ‘माणसं थोडी चार्जर्स फार’ च्या जमान्यातही तुमची शिकवणी आहेचै का ??”

खरं म्हणजे आणखी अधिक काळ ‘भांडणाचा मूड’ राखणं शुभासाठी अशक्य होतं.
लग्न झाल्यानंतरच्या पहिल्या १५/२० वर्षांच्या काळात खूप वादविवाद होत असत. अर्थात् बहुसंख्य फॅक्टर्स कारणीभूत व्हायचे भांडणाला !😢

‘लहान जागेमुळे प्रायव्हसीच्या अभावापासून ते मोठ्यांच्या उपस्थितीत नवरयाला ‘अहो’च म्हणायला हवं ‘
अशी wide range असायची भांडणाच्या मुद्द्यांची !

मग महिन्यातनं ‘२ days १night’ वाली 😜 एखादी खेप व्हायची पुण्याच्या हाॅटेलमध्ये ‘तहा’साठी😀 हाॅटेलचं नावही समर्पक असं-‘समेट’ !!
शुभांगीनं ‘आठवणी’च्या रूपात ‘समेट’ची सगळी बिलं साठवायची ठरवली तर तो एक नवाच मुद्दा झाला भांडणाचा !😛

“शुभांगी, आज कशामुळे एवढा वादाचा मूडै ? अंs?? काय लहान सहान मुद्द्यांवरून भांडतेयस गं सक्काळपासून”

“मग काय करू ? मोठ्ठे पॅाईंटस् काही राहिलेच नाहियेत तर काढू तरी कुठून ??😉😉 आवडले का हे भांडणाचे ‘स्मॅाल स्केल काटे ??
परवाचं तुझं ‘चंदुभावजीं’ बरोबरचं बोलणं कानावर पडलं माझ्या. तुलाच ‘शांतता’ नकोशी झाली होती, राईट ?? म्हटलं ७ फेब्रुवारीला अशी करू सुरूवात व्हॅलेंटाईन वीकची “😊

“😳😳😳”

“Happy Rose Day शशिकांत ! नि हे गिफ्ट, मी स्वत: बनवलेलं.😍 चलो, इस बात पे बढिया चाय हो जाए !!”
हसत हसत शुभांगी किचन मध्ये घुसली सुध्दा !!
😆😆

हळुवारपणे शशिकांतनं त्या गुलाबावरून हलकेच हात फिरवला आणि….
‘हार्ट शेप्ड रेड बाॅक्स ‘ ह्रदयाशी धरून नंतर उत्सुकतेनं उघडला. आत, ‘समेट’ची बिलं क्रमवारीने सुगंधी पेपर लपेटून विराजमान झाली होती, वेळोवेळीच्या तहाचं ‘पदरमोड’ केलेलं नि तरिही ‘अमूल्य प्रतिक’ होऊन. !!😍😍😍

— लेखन : अनुजा बर्वे. मुंबई
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिल्पा कुलकर्णी on स्नेहाची रेसिपी ५
शितल अहेर on कविता
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on महिला गाडीग्रुप : अनोखे संमेलन
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on जिचे तिचे आकाश… १
गोविंद पाटील on महिला दिन : काही कविता
प्रोफेसर डॉ सुवर्णा गुंड-चव्हाण on “सुवर्णधन” सन्मानित