Wednesday, September 17, 2025
Homeकला'स्नेहाची रेसीपी' : १९

‘स्नेहाची रेसीपी’ : १९

“पिनट डेट्स चॉकलेट बाईट”

चॉकलेट तर सर्वांचीच आवडती त्यातून लहान मुलांची तर फेव्हरीट चीज आहे. मग याची सुरेख अशी बाईट तर नक्कीच आवडणार ना ?
जेवण झाल्यावर छोटीशी गोड, थन्ड बाईट खाल्ली की मन तृप्त व प्रसन्न होते. आईस्क्रीम तर नेहमी खाल्ले जातेच पण बरेच दिवस टिकणारी, हेल्दी आणि तितकीच टेस्टी बाईट खाल्ली तर छान बदल होऊन मस्त वाटते. कमी कष्टात सुरेख, आकर्षक दिसणारी मस्त अशी ही स्वीट बाईट आहे. करूया ना मग ?

साहित्य : 200 ग्राम भाजून साले काढलेले शेंगदाणे, अर्धी वाटी भाजुन क्रिस्पी केलेले तीळ, 300 ग्राम बिया काढलेला खजूर,100 ग्राम व्हाईट चॉकलेट,10 ग्राम डार्क चॉकलेट, पाव चमचा साजूक तूप किंवा बटर.

कृती : प्रथम शेंगदाणे मिक्सर मधून एकदम बारीक पूड करून घ्यावेत. मग खजूर मिक्सरमधून एकदम बारीक करून घेऊन ते दोन्ही छान मिक्स करावे. मग हातांना तूप लावून गोळा बनवून त्यांचे रोल बनवावेत. एका डिशमध्ये तीळ पसरून त्यात हे रोल घोळवावेत. साजूक तूप लावल्यामुळे रोल बनवणे झटपट तर होतेच पण स्वादपण मस्त येतो.

आता प्लास्टिकच्या पिशवीचे कोन घेऊन त्यात व्हाईट आणि डार्क ब्राऊन चॉकलेट घालावेत व कोन व्यवस्थीत बंद करावेत. मग ग्लासभर पाणी गरम करून त्यात हे दोन्ही कोन त्यातील चॉकलेट वितळेपर्यत ठेवावेत. ते वितळेपर्यंत लाकडी रोलने आपण बनवलेल्या शेंगदाणे व खजूराच्या रोलला मध्यभागातून आडवा शक्य तितका मोठा खड्डा पाडून पन्हाळी सारखे बनवावे. आता त्यात आधी वितळलेले व्हाईट चॉकलेट भरावे. मग थोड्या थोड्या अंतरावर डार्क ब्राऊन चॉकलेटने उभ्या रेषा काढाव्यात.

नंतर एका सुरीने किंवा चमच्याच्या दांडीने अलगद त्यातून लांबट अशी रेष मारल्यासारखे करावे म्हणजे ब्राऊन कलरचे व्ही शेप मध्ये डिझाईन बनेल. मग हे रोल सेट होण्यासाठी अर्धातास फ्रिज़ मध्ये ठेवावेत म्हणजे थंड झाले की चॉकलेट पण सेट होईल. शेवटी छोटे छोटे चौकोनी आकाराचे बाईटस कट करावेत. आणि घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावेत.

वैशिष्टय : हे बाईट्स भरपूर दिवस टिकतात. मुलांना तर तिखट पदार्थापेक्षा गोड पदार्थच खावेसे वाटतात. म्हणूनच हे बाईटस लहान मुलाना तर खूपच आवडतील कारण हे चॉकलेट्समुळे जास्तच टेस्टी बनतात. भाजलेल्या तिळाचा खमंग स्वाद, खजूराची गोडी, शेंगदाण्यामुळे स्निग्ध व हेल्दी बनतात. चॉकलेटमुळे इतर कोणतेच इसेन्स, वेलची पूड वगैरे घालण्याची गरजच नाही. शिवाय हेल्दि आहेतच आणि चॉकलेट्सच्या सुरेख डिझाईन मुळे दिसायला तर इतके आकर्षक बनतात की पाहून खाण्याचा मोह होणारच आणि खाल्यानंतर तर नक्की वाहवा होणारच मग लगेंच बनवा आणि सर्वांना खुश करा.

स्नेहा मुसरीफ

— लेखन : सौ. स्नेहा मुसरीफ. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा
सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं