आज “डॉक्टर दिन“. यानिमित्ताने ग्रॅज्युएट फोरम, मुंबई या पदवीधरांच्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मालाड, घाटकोपर, भांडुप, धारावी अशा अनेक ठिकाणी डॉक्टरांना भेटून त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पुस्तक, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र प्रदान केले.
कोरोना महामारीच्या कठीण परिस्थितीत जीवाची पर्वा न करता डॉक्टर कार्यरत होते. एरव्हीही ते आपली सेवा निर्व्याजपणे पार पाडत असतात. आज त्यांचा दिवस असल्याने आम्ही मुंबईतील शक्य तेवढ्या डॉक्टरांना भेटून त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अशी प्रतिक्रिया ग्रॅज्युएट फोरमचे संस्थापक अध्यक्ष श्री. जालिंदर सरोदे यांनी व्यक्त केली.
संघटना परिचय
ग्रॕज्युएट फोरम ही पदवीधरांच्या प्रश्नांसाठी, पदवीधरांच्या उन्नतीसाठी सतत कार्यशील असणारी संघटना आहे. या संस्थेच्यावतीने आजवर अनेक सकारात्मक कामे झाली आहेत.
पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवलेले श्री. जालिंदर सरोदे या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सोबत श्री. कैलास गुंजाळ, श्री. तिपय्या बैकडी, श्री. संतोष शिंदे , श्री. विजय गवांदे, प्रदीप भोईर, सुनिल कोळपे, संजय कालेल, गुलाब पाल, संदीप खताळ, अशोक हरीकेरी, सत्यप्रकाश राय, सदाशिव मदने, संजय मेखल, नवनाथ इथापे आणि असे असंख्य कार्यकर्ते जोमाने कार्य करीत आहेत.
शिक्षक, विद्यार्थी, पालक संघटना जोरदार असताना पदवीधरांचे प्रश्न माञ धूळ खात पडले होते. त्यांना वाचा फोडण्याचे काम ही संस्था करत असते. “पदवीधरांचा विकास हाच ध्यास” हे जणू या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे म्हणून कोणत्याही लाभाशिवाय कर्तव्य भावनेने ही संस्था नेटाने आपले काम करत असते.
– टीम एनएसटी. 9869484800