Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यपाऊस : काही कविता….

पाऊस : काही कविता….

१. पाऊस, पुरूषी चालीचा

डोंगराच्या डोक्यावर कसा नाचतो पाऊस
नदीमधे नागव्याने कसा हसतो पाऊस

वेडं उनाड वासरू बागडते रानोमाळ
घुंगराच्या तालावर कसा वाजतो पाऊस

भयभीत ओलीचिंब श्वास टाकते धरणी
आडरानी एकटीला कसा गाठतो पाऊस

गर्द गर्भार नदीचा डोह तुडूंबला पोटी
ओणावून उरीपोटी कसा भेटतो पाऊस

कातळाला भिजवून गवताला लोळवून
कड्यावरून दरीत उडी टाकतो पाऊस

झोंबाझोंबी आंगोपांगी कोसळून झाल्यावर
नामानिराळा त्रयस्थ कसा वागतो पाऊस

ओल्याकाळ्या अंधारात बेडकांची बडबड
ओलेत्याने येरझारा कसा घालतो पाऊस

पाण्या-माती भेटवून सारे रान पेटवून
हिरवी शाल पांघरून शांत झोपतो पाऊस

— रचना : साहेबराव ठाणगे.

२. !!! उन्हाळा की पावसाळा !!!

उन्हाळ्यात धो धो धो पाऊस
पावसाळ्यात जोर ऊन वारा
आभाळाकडे पाहता पाहता
करपून गेला हा शिवार सारा.

क्षणात ऊन तर क्षणात वारा
ऋतू ऋतूंचा बसेना की मेळ
  थेंब थेंब थेंबही पडत नाही
  इथे पिकांचा झाला की खेळ.

उरलीच नाही दाट झाडी
बदलून गेली निसर्गाची कळा
झाडे लावा झाडे जगवा
आहे उन्हाळा की पावसाळा ?.

— रचना : भागवत शिंदे पाटील. उक्कडगांवकर

३. 🌧️ पावसाळा 🌧️

आला आला 🌧️ पावसाळा 🌧️
वर्षताहे 🌧️ घनमाळा 🌧️ ।१

कडाडते⚡सौदामिनी⚡
उंचाविती भ्रू कामिनी ।२

वारा वाहे अवखळ
मृद्गंधाचा परिमळ ।३

नद्या, तळे भरतात
झुळुझुळु वाहतात ।४

चहूकडे हिरवाई🌳
चराचरी नवलाई ।५

नववधू सम धरा
भेटतसे प्रियकरा ।६

वसुंधरा🌏 तृप्त झाली
सृजनाची वेळ आली ।७

आकाशात अवचित
सूर्यप्रभा🌞 झळकत ।८

इंद्रधनु 🌈 सप्तवर्ण
दिव्यशोभा परिपूर्ण ।९

चैतन्याची पखरण
आनंदाची उधळण ।१०

वर्षाऋतु नेमे येई
हर्षवूनी सर्वा जाई ।११

— रचना : सौ. सुनीता फडणीस. गोवा

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा