Tuesday, September 16, 2025
Homeबातम्याडाॅ.भास्कर धाटावकर : ४ पुस्तके प्रकाशित

डाॅ.भास्कर धाटावकर : ४ पुस्तके प्रकाशित

महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख विभागाचे निवृत्त संचालक, इतिहास संशोधक डाॅ.भास्कर धाटावकर यांनी लिहिलेल्या विरंगुळा (कथासंग्रह), माझ्या महाराष्ट्र भूमीत (काव्यसंग्रह) कांगारूच्या देशात (प्रवास वर्णन) आणि महाराष्ट्रातील सागरी किल्ले या ४ पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या ७२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून नुकतेच मुंबईत संपन्न झाले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री आमदार अनिकेत तटकरे, आयुक्त राजीव निवतकर, दिग्दर्शक, अभिनेते राजन बने, साॅलीसिटर वाकरूलकर, गिरीश आहुजा हे उपस्थित होते.

सुरूवातीस क्रिती भार्गव यांनी सुरेल आवाजात इश स्तवन गायले.

त्यानंतर शरयु राजकुले यांनी डाॅ.भास्कर धाटावकर यांचा खडतर पण प्रेरणादायी जीवन प्रवास कथन केला. यावेळी सर्व वक्त्यांनी डाॅ.भास्कर धाटावकर यांच्या कार्याबद्दल गौरवास्पद उद्गार काढले.

कांचन धाटावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट, मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments