महिना सरत नाही तोच
पगाराची लागते ओढ
महिन्याच्या खर्चाची
लागली असते चढाओढ
पगार हाती आल्या आल्या
सुरू होते खर्चाची वजाबाकी
महिना सरता सरता
शुन्य उरतो हाती
पाहिलेल्या स्वप्नांची
राहते नुसती साठवण
उरलेल्या स्वप्नांची
उरलेली आठवण
नोकरीची फिरती चाके
कधी थांबत नाही
आणि अपेक्षाचे ओझे
कधी सरत नाही
आयुष्यभर अशीच
चालत राहते व्यथा
चाकरमान्याची
हीच असते गाथा
— रचना : सौ. शितल अहेर. खोपोली, रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800