अंधारुन येण्याआधी
संध्या आली फुलारुन
मंत्रमुग्ध गिरि-तरु
गंधकुप्या उघडून
अंगणास सजविले
रंगछटा शिंपडून
चंद्र चांदण्या खेळात
दंग व्हाव्या आनंदून
चंद लोक पुलावर
गंगा वाहे त्याखालून
जाती नौका विहारास
कंचनीय जलातून
मंदावले रवितेज
चिंताग्रस्त त्या पाहून
स्तंभ तत्पर सेवेत
कंदिलांसी पेटवून
— रचना : विजया केळकर. नागपूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800