ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे समाजाला मान्य नव्हते, त्या काळात त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1896 साली पुण्यातील हिंगण्याच्या माळावरील एका झोपडीत ४ मुलींसह स्त्री शिक्षणाचे बीज रोवले.
महर्षी कर्वे यांच्या अथक आणि निरपेक्ष कार्यामुळे आज संस्थेच्या महाराष्ट्रभरातील 64 शैक्षणिक शाखांमधून 30 हजारांपेक्षा जास्त मुली शिक्षण घेत आहेत. 125 वर्षांच्या वाटचालीत संस्थेचा पुण्याबरोबरच सातारा, वाई, रत्नागिरी, नागपूर, कामशेत याठिकाणी विस्तार झालेला आहे.
प्राथमिक शिक्षणापासून ते अभियांत्रिकी, नर्सिंग, व्यवस्थापन, वास्तुविशारद फॅशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान अशा विविध महाविद्यालयांमधून उच्च कौशल्ये प्राप्त केलेल्या मुली समाजाच्या विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवत आहेत.
असे असले तरी, आजही ग्रामीण भागातील मुली प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, असुरक्षित वातावरण, घरापासून दूर अंतरावर असलेल्या शाळा अशा विविध कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. ग्रामीण भागातील अशा अनेक मुली तसेच आईवडिलांचे छत्र हरपलेल्या मुली संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण करतात.
या मुलींच्या शिक्षणाचा, वसतिगृहात राहण्याचा खर्च संस्था उचलते. अनेक मुलींना शिष्यवृत्ती मिळवून देणे, शिक्षणासाठी आर्थिक पालकत्व मिळवून देणे, शैक्षणिक व परिक्षा शुल्कासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचे कार्य संस्थेकडून सातत्याने सुरु असते.
त्याखेरीज कमवा व शिका योजनेतून मुलींना प्रगतीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. मुलींमधील गुणवत्ता हेरून त्यांना योग्य शिक्षण व करिअरच्या संधी प्राप्त होण्यासाठी संस्थेचे सातत्याने प्रयत्न सुरु असतात.
संस्थेच्या प्रयत्नांना मुलींकडूनही तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळत जातो आणि त्यांना सन्मानाने आणि आत्मनिर्भरतेने जगण्याचे बळ प्राप्त होते. अशा अनेक मुली आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत .
आज संस्थेच्या वसतिगृहात शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या बालकल्याण समितीच्या शिफारशीने आलेल्या मुलीदेखील राहतात. यापैकी काही मुली अनाथ, एक पालकत्व असणाऱ्या, व अत्यंत गरजू मुलीही आहेत.
या मुलींच्या शिक्षणाची, राहण्याची सर्व व्यवस्था संस्थेतर्फे केली जाते. बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट 1950 आणि सोसायटी रजिस्ट्रेशन ऍक्ट 1860 अन्वये संस्थेची नोंदणी झालेली आहे. संस्थेला शासनाकडून मिळालेल्या अनुदानाबरोबरच समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी तसेच हितचिंतकांकडून मिळणाऱ्या देणग्यांच्या मदतीवर संस्थेचे कार्य अखंड सुरु आहे.
आपल्यासारख्या सामाजिक जबाबदारीची जाणीव असणाऱ्या संस्थेच्या हितचिंतकांनी पुढे येऊन गरीब, गरजू व होतकरु मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची आज गरज आहे.
या मदतीसाठी आपण खालील प्रकारे योगदान देऊ शकता.
१. भाऊबीज निधी योजना, (आर्थिक सहाय्य)
२. संकल्प’ ३६५, (आहारखर्च)
३. शैक्षणिक सहाय्य योजना, (शालेय साहित्य)
४. आर्थिक पालकत्व योजना, (शाळा, वसतिगृह व इतर खर्च)
५. दाननिधी योजना, (शिष्यवृत्ती)
देणगी रक्कम ऑनलाईन पद्धतीने देण्यासाठी बँकेचा तपशिल खालीलप्रमाणे :-
Bank Account details for online donations – For donation in “Indian Currency”
Account holder’s Name – Maharshi Karve Stree Shikshan Samstha
Bank Name – Canara Bank
Account Number – 53392010017120
IFSC CODE – CNRB0015339
MICR – 411015061
Address – Karvenagar, Pune
For donation in “Foreign Currency”
ACCOUNT NAME
Maharshi Karve Stree Shikshan Samstha
NAME OF BANK :- State Bank Of India
BRANCH :- Erandwana, Pune
ACCOUNT NO. 11138215873
A/C ACCOUNT TYPE :- Savings Bank A/C
IFSC CODE :- SBIN0004618
SWIFT / BIC CODE SBININBB218
ऑनलाईन पद्धतीने देणगी दिल्यास, कृपया donation@maharshikarve.org या ईमेल वर आपले नांव, पत्ता, ई-मेल, फोन नं., पॅन नं.व UTR नं. पाठवावा.
संस्थेबद्दलची सविस्तर माहिती www.maharshikarve.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अथवा आपण संस्थेशी ई-मेलद्वारे administrator@maharshikarve.org अथवा दूरध्वनीद्वारे ०२०-२५३१३२०० /
श्री. प्रदीप वाजे, जनसंपर्क अधिकारी :- ९०२८७९०४१७
प्रणाली कुलकर्णी : – ९९७००६११४० या क्रमांकावर संपर्क करु शकता.
– देवेंद्र भुजबळ 9869484800.