सांग सांग पावसा
किती तुझी वाट पाहू
करपून जातंय पीक माझं
किती उभा ताट राहू.
बारा महिन्यांची मेहनत
अशी नको वाया घालू
बघ थोडं डोळे उघडून
सांग कसा प्रपंच चालू.
या केविलवाण्या जीवाची
हाक पडेल कानी
तुझ्याविना जगणे कठीण
सांग कधी पडेल पाणी.
ये रे ये रे पावसा
आतूरली धरती
इवलेसे रोप देखणे
अवलंबून तुझ्यावरती

– भागवत शिंदे पाटील. उक्कडगांवकर.
सुंदर