पुणे येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे कळताच अस्वस्थ होऊन लिहिली गेलेली कविता…
गुंतत का जातो
मनात विचारांचा गुंता,
त्या गुंत्यातून सुटता सुटता
तो स्वतःच त्या अंधाऱ्या गुहेच्या
जात असेल खोल गर्तेत ओढला
असतीलही अबोध प्रश्न
निरस असं अंधारलेलं अवकाश
चौफ़ेर नि शब्द काळोख,
उत्तर नसलेला
फक्त आणि फक्त प्रश्नांच्या रुंजी
होत असतीलही कदचित
बोथट संवेदना
पण
पण
चालत राहील पाहिजे
अवघड प्रश्न असला तरिही
जगताना आयुष्य दुसरी ओळ
ही मोहर त्या उतराचीच
हे सांगणारं वेळेवर न भेटणं,
प्रारब्ध हाच खरा गुंता
नाही तर
झाल्या असत्या मुक्त भावना
धुमारे फुटले असते शब्दांना
दु:खाला फुटले असते कढ
होऊ न देता गुंत्याचा गोळा
वेदना साचलेल्या ओझ्याचा
कदचित निघाला असता बोळा …….

– रचना : ममता संजय मुनगिलवार
खूप च भावस्पर्शी