मुंबईतील शिवशाही कोकण कलामंचने ऑनलाइन कलांश स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी स्पर्धकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
स्पर्धेचा कालावधी ०१ जून २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत होता. स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
यामध्ये १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या कलेचे चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आणि या स्पर्धेला वेगळं रंग रूप आणले.
या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले सर्व स्पर्धक पुढीलप्रमाणे आहेत.
सोलो डान्स स्पर्धा –
प्रथम क्रमांक :- अनुष्का दत्तात्रेय भंडारे ( विभागून ), महेंद्र बनसोडे ( विभागून ), द्वितीय क्रमांक :- अभिषेक घवाळी, तृतीय क्रमांक :- सुलोचना अनिल प्रभू…
सोलो गायन स्पर्धा-
प्रथम क्रमांक :- अलका गोडबोले, द्वितीय क्रमांक :- अन्वयी कुष्टे, आणि
एकपात्री अभिनय स्पर्धा –
प्रथम क्रमांक :- आर्या सुधीर गजेंद्रगडकर, द्वितीय क्रमांक :- हर्षला गणेश पेडणेकर.
या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
डान्स स्पर्धे साठी 65 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सर्वांनी उत्तम प्रकारे आपल्या डान्सचे सादरीकरण केलं.
गायन स्पर्धे साठी देखील 57 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. सर्वांनी उत्तम प्रकारे गायन सादर केलं.
एकपात्री अभिनय स्पर्धा मध्ये 23 स्पर्धकांनी सहभाग घेतला. सर्वांचे सादरीकरण उत्तम होते.
स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक – सोलो डान्स स्पर्धा :- गणेश पुजारी सर (नवतरंग कलामंच मुंबई नृत्यदिग्दर्शक/काळेश्वरी नाट्य नमन मंडळ नृत्यदिग्दर्शक),

सोलो गायन स्पर्धा :- पांजणे सर (बुलंद आवाजाचा बादशहा)

एकपात्री अभिनय स्पर्धा :- रमेश पवार सर (बत्तकु – एक वास्तविकता- मराठी चित्रपट लेखक/दिग्दर्शक)

शिवशाही कोकण कलामंच, मधील सदस्य सुरज हातणकर, सिद्धेश घाडी, अक्षय घाडी, भूपेश पड्यार, प्रमोद सूर्यवंशी, भूषण हातणकर, सुरज कुवार, प्रथमेश घाडी, प्रशांत हातणकर, किरण हातणकर, धीरज हातणकर, महेश पुजारी, तनुजा चोरगे, दिक्षा लाड, नेहा बारसकर, कुंजल सौंदाळकर, हेमलता गोंडाळ, स्वप्नाली सरवनकर या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं.
या स्पर्धकांचे व्हिडीओ रेनबो क्रियेशनचे चालक अमर फटकरे यांनी उत्कृष्टपणे सादर केले. तसेच संस्थेला नवनविन संकल्पना देणारी आणि सर्व गोष्टीमध्ये सहकार्य करणारी पूजा जाड्यार, तसेच विशेष मार्गदर्शक (बात्तकु – एक वास्तविकता) मराठी चित्रपट लेखक / दिग्दर्शक श्री रमेश पवार सर या सर्वांचे सहकार्य लाभले.
यापुढेही अशा प्रकारचे नवीन नवीन उपक्रम राबविण्याचा संस्थेचा मानस आहे.
– देवेंद्र भुजबळ 9869484800.