अंदमान येथे चिडिया टापु या आयलँडजवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नवीन पुतळ्याचे अनावरण तसेच सावरकर प्रेरणा उद्यानचे उद्घाटन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नुकतेच झाले.
छत्रपती संभाजीनगर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळाच्या सदस्यांनी या पुतळ्यासमोर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे..
जयस्तुते,
ने मजसी ने परत मातृभूमीला,
अनादि अनंत मी,
महाराष्ट्र गीत, जय जय महाराष्ट्र माझा,
१५० वर्षे ज्या अजरामर गीताला पूर्ण झाले असे संपूर्ण वंदे मातरम गीत सादर केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रगीत झाले. ही संपूर्ण गीते श्री व्यंकटेश देशमुख, संजय घायाळ, ललित कासार, प्रमोद नशिराबादकर, स्नेहल पाठक, भाऊ सुरडकर, माधुरी देशमुख, संगीता पाडळकर, मंजुषा देशपांडे यांनी गायली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली कुलकर्णी यांनी केले.
अंजली जोशी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दर्शनाची नाटिका सादर केली.
सुनील जोशी यांनी सावरकरांच्या जीवनपटाची, त्यांच्या साहित्याची माहिती सर्वांना करून दिली.
साहित्यिका आशा पैठणे यांच्या गगन जाई; दिले घेतले, या पुस्तकाचे प्रकाशन स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री भाऊ सुरडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

सुंदर मांगधरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार यावेळेस प्रदान करण्यात आला.
नेताजी आयलँड वर प्राणी जगतात रमणाऱ्या अनुराधाताई यांनी तिथल्या संपूर्ण आयलँड ची व प्राण्यांची, सखोल माहिती सर्वांना करून दिली.

संपूर्ण सावरकर भक्त पांढऱ्या पोशाखात होते.

सेल्युलर जेलच्या प्रांगणात तसेच सावरकरांच्या पुतळ्याच्या समोर भारत माता की जय, वंदे मातरम, अमर रहे अमर रहे स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे, एकुणच सेल्युलर जेलचा परिसर व नवीन सावरकर पुतळ्याचा परिसर दुमदुमून गेला होता. प्रत्येकाच्या मनात देशभक्तीचे स्फुलिंग जागृत करणारी ही एक अनोखी अंदमान यात्रा झाली.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाऊ सुरडकर, स्नेहलताई पाठक, प्रथमेश कुलकर्णी, तेजस त्यांनी प्रयत्न करून हा अभिवादन सोहळा संपन्न झाला आहे.
— टीम एन एस टी. ☎️ +919869484800
