1)
रंगातआलेला डाव
मध्ये सोडला अर्धा
शोकाकुलस्थितीत
निवर्तले प्रिय दादा
दिलदारअंतःकरण
उमदा हा शहजादा
सांभाळे दिलाशब्द
परिपूर्णकरेलं वादा
स्पष्टपणे होय नाही
कुणा ना लावे नादा
विरळाअसला नेता
जीवापाडजपेशब्दां
चुकीला ताडण करे
मुळी ना आडपडदा
जनसंपर्क रे दांडगा
सेवाव्यग्रसदासर्वदा
खिलाडी वृत्तीत घेई
सहजते झेली निंदा
दूरदृष्टी विचार शक्ती
लढवैय्ये योध्दा खंदा
अजीत नाव हे सार्थ
लटपटेपराजयसुध्दा
पाॅवरहाऊस आगळे
जन भावनेवर श्रध्दा
उदिष्टपूर्तता होताचं
मध्ये करी अलविदा
खेळ खेळते नियती
त्रोटक आयु मर्यादा

–– रचना : हेमंत मुसरीफ. पुणे
2)
नाळ जोडलेली सर्वांशी
सुनवे रोखठोक शब्दात
सार्थकी अजित नावानीशी
बेधडक ब्रीद ते जपतात…
घेरा असे सभोवताली
कामासाठी जनतेचा
ढीगभर असे फायली
झरा मुखावर उत्साहाचा..
कर्म करण्या मध्यभागी
पहाटेच कामास बसती
सभेत ही सर्वात आधी
प्राधान्यने कार्येच करती…
प्रेमळ निर्भीड मनाचा
नेता प्रिय तो दिलदार
खंबीर असती निर्णयाचा
जरब आवाजात दमदार…
बांधिलकी असे पक्की
शब्दाला कायम जपती
कर्तव्यास कठोर गती
बोल सत्य ओठी असती..
घडे कधी न यापुढेही
इमानी नेता या जगी
डाव साधला काळानेही
केली स्वर्गात रवानगी…

— रचना : सौ मीना घोडविंदे. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ.अलका भुजबळ. ☎️ 9869484800
