कोणी लहान होते कोणी महान होते
गर्दीतल्या मुलांचे चेहरे भयाण होते
आलो इथे कशाला माहीत ना कुणाला
नाऱ्यात पण तयांच्या सच्चे विधान होते
आक्रोश हा कुणाचा झालेत जखमी कोण
घेणारे सापडले परंतु देणारे होते कोण
हाकलले ज्यांना यांनी निवडले तयाना कोणी
नालायक जर ते होते शहाणे कोण होते
अन्याय तर होतो आहे भ्रष्टाचारही आहे
चिखलात बरबटले सगळे सुस्नात कोण होते
चारित्र्य नीती चे पाठ शिकवले कुणी कोणाला
आंगठा कापला ज्यांनी ते द्रोण कोण होते

— रचना : प्रा डॉ विजय पांढरीपांडे. हैद्राबाद
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
