Homeसेवासानपाडा : ज्येष्ठांसाठी आठवणीतल्या कविता !

सानपाडा : ज्येष्ठांसाठी आठवणीतल्या कविता !

नवी मुंबई : सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी  अमृतस्वर प्रस्तुत  शालेय जीवनातील “आठवणीतील कविता” या शालेय जीवनातील कवितांच संगीतमय सुंदर सादरीकरण झाले. सानपाडा येथील  ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात नुकताच “आठवणीतील कविता” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शाळेतील पाठयपुस्तकातील अगदी इयत्ता दुसरी पासूनच्या कविता,  गाण्याच्या रुपात सादर केल्या गेल्या. भक्तीरस, निसर्ग, जीवनातील सार, आईची माया, बडबड गीते, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रप्रेम अशा वेगवेगळ्या विषयांच्या कविता सादर सादर करण्यात आल्या. ज्येष्ठ नागरिक रसिकप्रेक्षक अगदी आपल्या बालपणीच्या आठवणीत रमून गेले होते, गायकांसोबत प्रत्येक कविता गुणगुणत होते.

जुन्या काळामधील आठवणीतल्या कवितांचा संगीतमय कार्यक्रम सर्वांना चांगला आवडला. निवेदक निलेश भेरे यांच्या निवेदनाचंही कौतुकही तितकंच होऊन ते सर्वांच्या मनाला खूप भावलं.

या कार्यक्रमात  गायक कलाकार – सौ. अमृता निलेश भेरे, पुष्पलता पडवळ, श्री. सचिन तेली सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाची संकल्पना मुंबई पोर्ट ट्रस्टमधील कलाकार व गायक महेंद्र कुरघोडे आणि विद्या निकम यांची होती.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष आणि नाट्य कलाकार राम काजरोलकर, न्यूज स्टोरी टुडेचे संपादक देवेंद्र भुजबळ, जगन्नाथ देसाई, वृषाली चव्हाण यांनी कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक भाषण संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी केले तर आभार संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गायक कलाकार अमृता भेरे, पुष्पलता पडवळ, सचिन तेली आणि निवेदक निलेश भेरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी संघाच्या महिला मंगळाग्रुपने “खेळ खेळूया मंगळागौरीचा” या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक मिळविले, त्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments