Thursday, September 18, 2025
Homeसाहित्यप्रणुचाराक्षरी

प्रणुचाराक्षरी

नवी मुंबईतील कवियत्री शोभा कोठावदे यांचा
चाराक्षरी काव्य रचना हा छंद आहे. त्यांच्या आजवर ४५८ कविता लिहून झाल्या.
चाराक्षरी काव्य अर्थातच उच्च दर्जेदार यमक महत्वाचे, चार ओळीत फक्त चार वर्ण घ्यावे दुसरी, चौथी ओळ यमक महत्वाचे आहे. सारखे शब्द यमक घेतांना नसावेत जसे ___आहे आहे
करा करा
उच्च दर्जाचे म्हणालात तर
आहे पाहे वाहे राहे
संत खंत दयावंत गुणवंत प्रतिभावंत यशवंत कीर्तिवंत औक्षवंत इ.

आज आपण पाहू या, त्यांच्या काही प्रणुचाराक्षरी

विषय “वनस्पती

वनस्पती
स्वतःहून
आंबा केळी
पेरुतून

मानवास
देणे ठाव
चराचर
मारी ताव

कंद मुळ
लपवून
बटाटातो
भुईतून

गाजरही
मुळा कांदा
लपवते
मोठा वांदा

वनस्पती
दानशूर
आयुष्यात
देती पूर

सर्वजण
देती पाणी
पशू पक्षी
गाती गाणी

काही फळ
लपवता
मुळासह
उपटता

जो मनुष्य
विद्या ज्ञान
शक्ती खर्ची
देतो दान

समाजाच्या
सेवेसाठी
खर्च करी
दानापाठी

समाजात
मिळे मान
जगा वाटे
अभिमान

ज्ञानार्जन
देत नाही
समाजही
फेकू पाही

कमवतो
स्वार्थापोटी
त्याची ठरे
सदा खोटी

– रचना : सौ शोभा कोठावदे

विषय “कढीपत्ता

भारतीय
पदार्थात
कढीपत्ता
वापरात

औषधांचे
गुणधर्म
व्हिटामिन
जाणे मर्म

लोह आणि
फाॅस्फरस
आढळते
तत्वरस

चहामध्ये
लिंबू घ्यावा
आठ दिस
पत्ता प्यावा

केस होती
घनदाट
श्वेत रंग
नायनाट

पाने वाटा
दही घाली
काळे भोर
केस झाली

सुकी पानं
वाळवावी
थंड होता
ती गाळावी

थोडे उष्ण
तेल करा
डोक्यावर
घासा जरा

दररोज
लावा जर
फायदाच
होतो तर

– रचना : सौ शोभा कोठावदे

विषय “गोंदण

शरीरात
चित्राकृती
आठवात
ठेवा स्मृती

गोंदण्याची
कला असे
आयुष्यात
जना ठसे

सौंदर्याचा
दृष्टीकोन
रेखांकित
समजोन

रंगद्रव्य
समजून
व्रण घेती
उमटून

विजयाचे
चिन्ह जणू
गोंदल्याचे
शास्त्र म्हणू

नारी वर्ग
समजता
त्यांच्या अंगी
सहनता

साधन ती
टोकदार
काटे हाडे
गोंदणार

सुई सम
टोकदार
हत्याराने
गोंदणार

रंगद्रव्य
निळसर
काळी पुड
उठेतर

वृक्ष साली
वापरावी
कोळशात
मिसळावी

बोर्निओत
चित्र ठसा
उस रस
बूडे जसा

जपानात
सुया चार
ठशासाठी
त्या घेणार

भारतात
कारल्यात
रस तेल
काजळ्यात

गोंदणात
लेप लावा
एरंडेल
हळ्दी घ्यावा

ऑस्ट्रेलिया
पाठीवर
आदिवासी
गोंदे तर

तैवानात
लग्ना आधी
मुखावर
गोंदे मादी

गिनितील
जमातीत
अंगभर
गोंदावीत

आसामात
नागा जाती
तरुणास
लग्न ख्याती

नानाविध
आकारात
चित्र सारे
उठतात

बायबल
पैगंबर
यांनी बंदी
केली तर

राजकीय
कैदी याला
भाळावर
गोंदे त्याला

आधुनिक
काळातर
टॅटू गोंदे
अंगभर

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा