ढग फुटला कधीचा
आभाळ फाटलं सार,
सृष्टी करते का आक्रोश
अश्रूंचा वाहतो महापूर
वाटलं होतं येतील
ओथंबून श्रावण सर
काळ्या कुट्ट ढगांनी तर
केला माणूसकीचा गहिवर
रिमझिम, रुनुझुणू
हिरव्या गार सृजनाचा,
टिपटीप बरसणारा पाऊस,
कोसळताय ते शब्द वाटताय परकी
आसमंतातला आक्रोश ओला,
ढिगाऱ्या खालचे श्वास
वाहते अस्तित्व, दुःखाचा भवताल
मांडणार कसे, कविता झाली मुकी

– रचना : ममता मुनगीलवार