कोरोनाने आम्हाला काय काय शिकवलं
सर्व जग कसं
हैराण करून सोडलं
रातोरात सर्वांना कुलूप लागलं
पण एक मात्र लक्षात आलं
काहीतरी जगायचं राहून गेलं
भौतीक सुखाच्या मागे आम्ही
धावत होतो फक्त
आनंद तर गगनात विरला
समाधान झाले लुप्त
कोरोनाने आम्हाला वळणावर लावलं,
धावपळीच्या या काळात
कुठेतरी थांबवलं
वादसंवाद का होईना पण
भिंती लागल्या बोलायला
बंदिस्त झाले तरी
नाते लागले हसायला
सुप्तगुणांना जणू
बाहेरच काढलं.
कोरोनाने खरंच जगायला शिकवलं
निसर्ग तर प्रथमच हसला
कसा हिरवाकंच झाला
नद्या समुद्र आकाश
कसे लखलखीत झाले
प्रदूषणाचे जणू थैमानच थांबले
छोट्याशा या विषाणूने सृष्टीचे
खरे रूप दाखवले
देवानेही हात काढले
देवालय बंद झाली
चर्च मज्जित तर आता
ऑनलाइन केली
डॉक्टर आमचे देव झाले
पोलीस पहारेकरी
तेच आमचे दाता,
अन् तीच आमची वारी
कोरोनाने सर्वांना
घरात बंदिस्त केले
सधन निर्धन सर्वानाच
एका पातळीला आले
काहीही हाती नसताना
सर्व सुरळीत चाललंय
ती धावपळ, अन् ती स्पर्धा
सर्वांना खूप दूर सारलय
अचानक बंद झाले
जातीयवादाचे लढे
सरकारने पुकारले
आत्मनिर्भरतेचे धडे
प्रत्येक जण इथे
स्वावलंबी झाला
स्वतःचे काम आता
स्वतः करू लागला
दारूअड्याने सावरले
डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला
खरच कसा रे तू मानवा
जिथे खायला नाही
तिथे प्यायला तू तयार झाला.
कित्येकाचे नाहक बळी गेले
अनेक रस्त्यावर आले
उपासमार लाठीमार
सामान्य वर्ग मात्र
लढतच राहणार
कोरोनाने मात्र
मरण सोप केलंय
अन् जगणं कठीण झालंय
एकविसाव्या शतकातही
सर्व अशक्य होऊन बसलय
जगाला हातात आणणार्या स्मार्टफोनने,
आम्हाला एकट करून टाकलय
मास्क लावा घरात राहा
हात धुवा अन् स्वच्छ रहा
कंटाळा आला आहे
आता या सर्वांचा
घरात करमेना,
अन् बाहेर कोरोना
आम्हाला रिकामं
बसवतच नाही
अन् काही करावसं
वाटतही नाही
सवय झाली आता
या जगण्याची
मरमरत मरायची,
पळपळ पळायची
आम्हाला नाहीच मुळी बदलायचं
कोरोना म्हणतो
मग मला नाही इथून हलायचं
सोशल डिस्टंसिंग मुळे
आम्ही थोडे दूर झालो
दुरावा का होईना,
मनाने मात्र जवळ आलो एकमेकांसाठी दयेचे
पाझरही फुटले
मानवतेचे एकजुटीने
नव्याने उदयास आले
बघितले आम्ही
अनेक नविन संकट
भूकमारी हाणामारी
आणि आता महामारी
शक्तिवान झालो आम्ही
आता कोरोनाला झुंज द्यायला
आहे अजूनही भारी
1914 चा world war असो की
1918 चा spanish flue
प्रत्येक संकटावर मात करीत
आम्ही तोही पार केला
1929 चा दुसरा world war अन्
1947 चा स्वातंत्र्यलढा सुद्धा
आम्ही शौर्याने जिंकला
निघेल याला पण
कुठला तरी उपाय निघेल
थोडे आपण धीराईने राहु
दृष्टिकोन आपला बदलवू
शासनाचे पालन
काटेकोरपणे करू
घरात बसून कुटुंबासमवेत,
थोडे नाचू गाऊ बागडू
सरकारलाही थोडा
हातभार मात्र लावू
एक दिवस उजाडेल
जरा वाट पाहू
हातात हात धरून
एकजुटीने राहू
अन् नव्याने ,नव्या जगाचे
स्वागत गीत हर्ष आनंदाने गाऊ
जाईल हा कोरीना
निश्चितच जाईल
ही पण वेळ निघून जाईल
पण सर्व काही बदललेलं असेल
ते जग काहीतरी वेगळं असेल
सुंदर की भयावह
हे मात्र वेळच ठरवेल
आपल्या मानवतेवर
विसंबून ते असेल…
खरंच कोरोनाने खूप काही शिकवले
जीवनाचे एक कठीण, सूत्रच उघडले
मानवतेला आमच्या एक आव्हान दिले,
माणसातल्या देवाला शेवटी
कोरोनानेच शोधले…
– रचना : शिल्पा तगलपल्लेवार गंपावार,
केमॅन आयलँड्स
सुंदर रचना