Friday, November 22, 2024
Homeबातम्याCovidCare सातारा: पत्रकारांनीच पत्रकारांसाठी उभारलं कोरोना केअर सेंटर

CovidCare सातारा: पत्रकारांनीच पत्रकारांसाठी उभारलं कोरोना केअर सेंटर

कोरोना बाधित पत्रकारांना गृह विलगीकरणात ( होम आयसोलेशन) येणार्‍या अडचणी लक्षात घेवून सातारा जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घेवून सातार्‍यातील यवतेश्वर परिसरातील हॉटेल निवांत येथे पत्रकारांसाठीचे कोरोना केअर सेंटर सुरु केले आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभे केलेले हे पहिले कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन) आहे.

Click here to readCovid warrior : ८० वर्षांचे पत्रकार अण्णांची कोरोनावर मात

सातार्‍यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 31 हजाराच्या पुढे तर मृत्यूंची संख्या 900 च्या पुढे गेली आहे. सातार्‍यात फिल्डवर व कार्यालयात काम करणार्‍या काही पत्रकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत. मात्र पत्रकार कोरोना बाधित झाल्यानंतर स्वतंत्र होम आयसोलेशनची सुयोग्य व्यवस्था नसल्याने सातार्‍यातील पत्रकारांना अडचणींना सामोरे जावे लागत होते.

Click here to readCovid Warrior : कोरोनाला हरवलं कणखरतेने!

सातारा जिल्हा पत्रकार संघाने त्यावर तोडगा काढत सातार्‍यातील हॉटेल निवांत येथे १६ बेडचे विलगिकरण प्रशासनाच्या सूचनेनुसार याबाबतची नियमावलीही पत्रकार संघाने तयार केली असून त्यानुसार सातार्‍यातील ज्या पत्रकारांना घरी गृह विलगीकरणाची ( होम आयसोलेशनची ) सोय नाही अशाच गरजू कोरोनाबाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था आहे. या कोरोना केअर सेंटरवर पत्रकारांसाठी दोन ऑक्सिजन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. तर आरोग्य विभागामार्फत 1 डॉक्टर व दोन नर्स उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याशिवाय आयसोलेशन सेंटरवर दोन वेळच्या जेवणाची व नाष्ट्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. होम आयसोलेशन किटही सेंटरवर ठेवण्यात आले आहे.

Click here to readकोरोना जाणा:कोरोना टाळा

वृत्तपत्र अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या व्यवस्थापनांमार्फत ज्यांची पत्रकार , छायाचित्रकार , इलेक्ट्रॉनिक मीडियाचे रिपोर्टर म्हणून सातारा जिल्हा माहिती कार्यालयाकडे अधिकृत पत्रकार म्हणून नोंद आहे अशाच पत्रकारांना या सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ज्या बाधित पत्रकाराची ऑक्सिजन लेव्हल 94 पेक्षा वर आहे त्यांनाच या विलगीकरण केंद्रात प्रवेश मिळणार आहे. तेही प्रशासकीय आरोग्य यंत्रणेच्या मार्फतच तपासणी करुनच हा प्रवेश मिळेल. एकदा प्रवेश दिल्यानंतर विलगीकरण कक्षातून 10 दिवस बाहेर पडता येणार नाही. बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा केंद्रात प्रवेश मिळणार नाही.

Click here to readCovid Warrior : कोरोनाला हरवलं कणखरतेने!

या केंद्रावर आरोग्य यंत्रणेमार्फत डॉक्टरांसह त्यांचे सहाय्यक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आरोग्याची तक्रार असल्यास तत्काळ संबंधितांना कळवणे आवश्यक आहे. या केंद्रात येताना 10 दिवसांच्या राहण्यासाठी लागणारे कपडे , नियमित घेत असलेली औषधे व आवश्यक त्या वस्तू स्वत: आणाव्या लागतील. या केंद्रात धूम्रपान, मद्यपान अथवा कोणत्याही प्रकारचे व्यसन करण्यास सक्त मनाई असेल. हे केंद्र कोरोना केअर सेंटर आहे. उपचार केंद्र नाही. त्यामुळे गृह विलगीकरणाची सोय नसलेल्या पत्रकारांसाठीच ही व्यवस्था आहे. कोरोनाबाधित झालेल्यांपैकी ज्यांना जास्त त्रास होईल त्यांनी थेट वैद्यकीय उपचार घ्यावेत. अ‍ॅडजेस्टमेंट म्हणून कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही जिल्हा पत्रकार संघाने जाहीर केले आहे. पत्रकारांसाठी पत्रकारांनी तयार केलेले हे पहिले कोरोना केअर सेंटर असेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments