चंद्रमौळी झोपडीत ही सुख वाटे अपार
जिथे नाही पैशाचा, द्वेषाचा नकोसा भडिमार
जिथे आनंदाला, समाधानाला पारावार
मने जपती एकमेकांची असा असे परिवार
मीठ भाकरीतही सुखाचा घास लागे मधुर
काळजी वाहे बाप, माऊलीचा मायेचा पदर
बहिण भावंडांचे नाते किती हे वाटे निरंतर
आजी आजोबांचा विश्वासाचा मोठा आधार
खोपट्यातही लेकरे आहेत गुणी सुखी हे घर
नाही हाव मोठेपणाची, श्रीमंती मनाचे दार
खेळीमेळीत कष्ट करीत पोटभरे घरदार
शिक्षणाने, संस्काराने नमविले, नाही लाचार
एकमेकां सुखदुःखे कसा देती हे आधार
असे समाधानी सदा, देव त्यांनाच निती देई वर
समाधान हेच भाग्याचे दार

– रचना : स्वप्नगंधा सतीश आंबेतकर