संगमनेर येथील पेटीट विद्यालयाच्या १९७१ च्या मॅट्रिक च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहबंध हे संमेलन नुकतेच पुणे येथे पार पडले.
आता वयाच्या सत्तरीत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभागी होऊन जुन्या आठवणी जागवल्या. इतक्या वर्षांनी आपल्या वर्ग भगिनी, बंधूंनी एकमेकांस पाहताच सर्वांचे चेहरे चांगलेच खुलले.

बालपणाचे सवंगडी भेटल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शाळेतील आठवणी, खोडकरपणा यांना सर्वांनी उजाळा दिला व पुनःश्व एकदा तरुणाईचा आनंद लुटला.

५४ वर्षांपूर्वी मॅट्रिक झाल्यावर वेगळे झालेले हे सर्व जण आता समाजात अत्यंत प्रतिष्ठित पदांवर कार्यरत आहेत. काही जण कारखानदार, काही यशस्वी व्यापारी, काही सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक आहेत.

या सर्वांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांच्या कलागुणांचा आविष्कारही सादर केला गेला.
या स्नेहसंमेलनाचे प्रायोजकत्व याच विद्यार्थ्यांमध्ये मोठा झालेला यशस्वी कारखानदार कृष्णा बुब यांनी स्वीकारले होते. त्याला झिंजाड, बोरकर, कर्चा, मुंगी, संत अशा पुण्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोलाचे सहकार्य केले.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खूप छान
अश्या कार्यक्रमा मुळे जुन्या आठवणी जाग्या होतात व त्यामुळे मन प्रसन्न होते.