१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा कालावधी “स्वच्छता पंधरवडा ” आहे.या निमित्ताने स्वच्छतेचे महत्व सांगणारी ही कविता…
– संपादक
जिथे स्वच्छता वसे,
तिथे आरोग्य दिसे || धृ ||
घरात करी स्वच्छता,
स्वच्छ करु परीसर
आपल्या सर्वांचा
समोरच्यावर होई असर
तिथे खरे आपले
सौख्य दिसे || १ ||
आपले विद्यालय- कार्यालय,
देशाच्या प्रगतीचे भवन
प्रवेश करताच,
प्रसन्न होई मनन
कारण तिथली कडक
शिस्त दिसे || २ ||
ठेवू कामाच्या फाईल्स-टेबल व्यवस्थित
राखू भिंती- कोपरे चकचकीत
प्रत्येक करदाता हि होई खुसखुशीत
तिथे खरी आपली संस्कृती दिसे || ३ ||
ट्रेन- टॅक्सीतून, घर-बाजारातून
वातावरण प्लास्टिक मुक्त दिसे
तिथेच खरा निसर्ग हसे || ४ ||
नका थुंकू-नका फुंकू
शांततेने प्रवासात
अपघात चुकवू
सर्वांनी व्यायामाची
परंपरा राबवू
चांगल्या सवयीने
आपला संसार हसे || ५ ||
स्वत: स्वत:शी संकल्प करुया
मी जिथे जाई
तिथे दिसे स्वच्छता
मी जे बोले ते असे नम्रता
आपले वेळापत्रक
सर्वांना नियमित दिसे || ६ ||
— रचना : विलास देवळेकर. मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800