Sunday, September 8, 2024
Homeसाहित्यकर्मयोगी

कर्मयोगी

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
– संपादक

कर्मयोगी हा कर्मयोगी
अष्टपैलू व्यक्तीमत्वाचा,दैदीप्यमान,
१२ मार्च १९१३ ला देवराष्ट्रात जन्म झाला
संपन्न, समृद्ध महाराष्ट्र केला ||

अभ्यासू, साहित्यप्रेमी, विचारवंत
सार्थ केले नाव यशवंत
केले आईच्या खंबीर साथीने
B.A L.L.B. पर्यंत शिक्षण ||

गांधी विचारांनी भारावून गेला,
शाळेच्या प्रांगणात तिरंगा फडकावीला
असहकार चळवळीत तुरुंगवास भोगला
1940 ला राजकारणात प्रवेश झाला ||

1942 ला वेणूताईंशी विवाह झाला
कांग्रेस जिल्हाध्यक्षाचा पदभार संभाळला
1946 विधानसभेवर निवडून गेले
विविध खात्यांचा कारभार सांभाळला ||

1.11.56 ला मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले
1 मे 60 ला संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले
56 ते 62 महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास केला ||

औद्योगीक, शिक्षण, सिंचन, सहकार
गती दिली विविध कामांना
मराठी साहित्य व भाषेच्या अभिवृद्धीसाठी
19 नोव्हेंबर 60 ला साहित्य, संस्कृतीं
मंडळाची केली स्थापना ll

राज्यकारभार विकेंद्रित करून
जिल्हापरिषद, पंचायतसमिति केली स्थापन
हिच निती देशाने अनुकरली ||

1962 ला हिमालयाच्या मदतीला,
सह्याद्रि धावला
मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री,
गृहमंत्री परराष्ट्रमंत्री, उपप्रधानमंत्री
पेलले समर्थपणे आव्हान देशसेवेसाठी
सिंहाचा वाटा उचलून सिध्द झाले
यशवंतराव चव्हाण ll

आशा दळवी

— रचना : आशा दळवी. फलटण
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments