Friday, January 3, 2025
Homeसाहित्यखरी दिवाळी

खरी दिवाळी

सुरकुतल्या गालांवर जेव्हा
मऊ कोवळे ओठ टेकती
दुखऱ्या खुपऱ्या साऱ्या जखमा
त्या स्पर्शाने भरून येती

तोल जाऊनी पडता पडता
आधाराला होते काठी
जगावयाला सूर सापडे
शुद्ध निरागस बाल्यासाठी

वास्तवातल्या सुखदुःखाच्या
चवीत अंतर जेव्हा नसते
वार्धक्याच्या निद्रेमध्ये
साखर पेरीत बाल्य बिलगते

डोळ्यावरची झापड जाऊन
इंद्रियात दाटते तरतरी
बाळा संगे खेळ खेळण्या
शरीर थकले धरी उभारी

कितीक सण आले नी गेले
कधीच नव्हती त्यात नव्हाळी
कृष्णासम सांगाती भेटे
आनंदाची खरी दिवाळी

सूर्यकान्त वैद्य

— रचना : सूर्यकान्त द. वैद्य. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

5 COMMENTS

  1. अतिशय सुंदर! वैद्य सरांची कविता आणि समर्पक चित्र योजना.आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  2. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचे मनोगत खरी दिवाळी कोणती हे सुरेख स्पष्ट करते.

  3. भन्नाट कविता. आपल्यात अफलातून काव्यगुण आहेत. अजून काही कविता वाचायला आवडतील. धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments