प्रत्येक माणसाच्या जीवनात, नाते संबंधात, जडणघडणीत, आठवणीत “नाती” ही खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
पण दिवसेंदिवस बदलत चाललेल्या कौटुंबिक, भावनिक, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत ही नाती हरवत चाललेली आहे की काय ? असे वाटायला लागले आहे.
उदा. नुकतेच मी एका लहान मुलाला, दुसऱ्याशी बोलताना ऐकले, तो त्याच्या मित्राला सांगत होता, “आमच्या कडे ना दोन दिवसांसाठी माझ्या मम्मीची सिस्टर राहायला आली आहे ! “मम्मीच्या सिस्टर ला मावशी म्हणतात, हे त्याला माहितीच नव्हते. त्यामुळे येणाऱ्या पिढीला नाती म्हणजे काय ? आपल्या एकंदरीतच व्यक्तिमत्व विकासात त्यांचे किती महत्व आहे, हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे.
अर्थात नाती ही केवळ रक्ताची नसतात. त्या पलीकडील सुद्धा काही नाती असतात. उदा.मैत्री, शेजारी, वरिष्ठ – कनिष्ठ, सहकारी, प्रसंग परत्वे निर्माण होणारी नाती वगैरे.
तर आपल्या जीवनावर प्रभाव टाकलेली नाती, आपल्या लक्षात राहिलेली नाती, आपल्याला आनंद देणारी नाती या विषयावर आपण आपले अनुभव, विचार, कल्पना अवश्य लिहून पाठवा. शब्द मर्यादा ५०० शब्द इतकी आहे.
आपले लेखन मराठीत, वर्ड फाइल मध्ये पुढील व्हॉट्स ॲप क्रमांकावर पाठवा. 9869484800
काही अनुषंगिक छायाचित्रे असतील तर ती ही अवश्य पाठवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800