नमस्कार मंडळी.
आजचा हा लेख लिहिणाऱ्या, आपल्या पोर्टलच्या सुरुवातीपासून च्या लेखिका सौ रश्मी हेडे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांना न्यूज स्टोरी टुडे परिवारातर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.
— संपादक
“न्यूज स्टोरी टुडे” या आपल्या पोर्टलला एका आठवड्यात तीनदा सन्मानित करण्यात आले त्याबद्दल प्रथम संपादक, लेखक आदरणीय देवेंद्रजी भुजबळ सर व पोर्टलच्या निर्मात्या अलकाताई या दोघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.
“न्युज स्टोरी टुडे” या आपल्या परिवाराचे कुटुंबप्रमुख म्हणजे श्री देवेंद्र भुजबळ सर व सौ अलकाताई भुजबळ यांनी प्रचंड मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर पोर्टलचे नाव साता समुद्रापार नेले आहे. या दोघांची कामावरील निष्ठा, प्रेम खरंच वाखाणण्याजोगी आहे. त्यांना मानाचा मुजरा.
सातत्य, चिकाटी, नाविन्यता, विविधता व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने ही उंच भरारी घेतली. एक एक पाऊल पुढे टाकत आज त्यांनी एक उंच शिखर गाठले. पोर्टलला आज पर्यंत अनेक मानाचे तुरे लाभले आहेत. ही घौडदौड अशीच चालत राहील यात तिळमात्र शंका नाही.
आपल्या कुटुंबातील सर्व वाचक व लेखक यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने बरोबर दोन वर्षांपुर्वी आमच्या घरी झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमाची आठवण झाली. या स्नेहमिलन मुळे, आम्ही इतकी वर्षे सातारा शहरात राहत असूनही ज्यांच्याशी आमची ओळख नव्हती, अशा शहरातील लेखक, कवी, हितचिंतक यांच्या ओळखी होऊन, छान मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या या पोर्टलने अनेकांना आनंद दिला. आज मायेने व प्रेमाने गुंफलेल्या या साहित्यरूपी माळेत अनेक मणी गुंफले गेले.

“न्युज स्टोरी टुडे” हे केवळ एक वेबपोर्टल नसून एक परिवार झाले. लेखकांना अनेक अविस्मरणीय आठवणी दिल्या, त्यांना हक्काचे व्यासपीठ दिले. त्यांच्या पैकी मी ही एक आहे. पोर्टलवर प्रसिद्ध झालेली माझी लेखमाला; पुस्तक रुपात आल्याने माझ्या जीवनाचे स्वप्न साकार झाले, हे तर मी कधीच विसरू शकत नाही.

आजच्या या व्यवहारी जगात असे निस्वार्थीपणे काम करणारे दुर्मिळ. अतिशय प्रसन्न व उत्साही असलेली ही जोडी नोकरीतून निवृत्त झाल्यावर देखील स्वस्थ न बसता कार्यरत आहे.

केवळ समाज हितासाठी कोणताही मोबदला न घेता काम करणारे हे दोन हिरे आहेत. त्यांची लकाकी अनेकांचे आयुष्य उजळत आहे. जगण्याला एक नवी दिशा दाखवत आहे. सर्वांचे आधारस्तंभ आहेत.
न्युज स्टोरी टुडे हा दिवा अनेकांच्या जीवनात प्रकाश देत आहे.
वैचारिक लेख, कविता, कला, साहित्य, यश कथा, विविध क्षेत्रातील माहिती असे एक न अनेक गोष्टी पोर्टलच्या माध्यमातून पहायला मिळतात. भावनिक स्पर्श व मानसिक आधार देण्याचे काम पोर्टल करत आहे.
लेखन, संपादन, निर्मिती, प्रकाशन ते पॉडकास्ट असे विविध पैलूने दिवसेंदिवस सजत चाललेले हे पोर्टल, ही त्याची शान आहे.
पोर्टलच्या निर्मात्या अलकाताई व संपादक देवेंद्रजी भुजबळ सर यांनी अनेक नवोदित लेखकांना संधी देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्यातील या अदृश्य कलेला न्याय दिला.
ही जोडी जणू विठू रखमाई भासते. जशी विठ्ठलाला प्रिय असते तुळस तसे यांचे काम म्हणजे त्यांच्या समाधानाचा कळस.
विशेष म्हणजे या वेब पोर्टल वर कोणतीही राजकीय बातमी नसते. कोणताही व्यावसायिक हेतू न ठेवता अगदी प्रामाणिकपणे हे मोलाचे काम करत आहे. सकारात्मक गोष्टींना वाव देऊन एक आशेची ज्योत निर्माण करत आहे.
“न्युज स्टोरी टुडे” चे बी पेरले होते ते त्यांच्या मुलीने म्हणजे देवश्रीने आणि आज त्यांचे एका भव्य व दिव्य वटवृक्षात परिवर्तन झाले ज्याच्या छायेखाली अनेक वाचक व लेखक निर्धास्थपणे मोकळा श्वास घेत आहे.
दिवसरात्र एक करून रोज काहीतरी नवीन देण्याचे काम हे वेबपोर्टल करत आहे. आज समाजात अशा पोर्टलची अत्यंत गरज आहे त्यामुळे नक्कीच सकारात्मक परिवर्तन होऊ शकेल.
पुन्हा एकदा “न्युज स्टोरी टुडे” चे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.💐

— लेखन : सौ रश्मी हेडे. सातारा
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
