(अष्टाक्षरी रचना)
मंञ सुखी जीवनाचा
आहे आपल्या हातात
कोणी वागले कसे ही
ठेवा गोडवा मुखात
एक रागवला जर
शांत घ्यावे दुसर्याने
नको रुसने फुगने
रहा घरात सौख्याने
मन जपावे सर्वांचे
शब्द बोलावे जपून
येवो किती ही संकटे
घ्यावे थोडे समजून
पैसा असतो शुल्लक
ठेवा माणसाची जाण
नको अबोला कोणाशी
रहा हसून खेळून
भोगलेल्या क्षणाचीही
गोड जपावी शिदोरी
समजून एकमेका
निष्ठा जोपासावी खरी
तोंडावर जे बोलावे
मागे नकोच टोमणे
संयमाणे घ्यावे थोडे
आपुलकीने वागणे
आहे त्यात सुख माना
मान ठेवा वरिष्ठांचा
नको काही उणी दूणी
मंञ सुखी जीवनाचा

— रचना : अनिसा सिकंदर शेख. दौंड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
कविता आवडली . मन: पूर्वक शुभेच्छा !
ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था, महाराष्ट्र.
अत्यंत सोप्या शब्दात रचलेली एक उत्तम बोध-कविता.