रिद्धपुर येथे मराठी भाषा विद्यापीठ सुरू झाले असून या विद्यापीठाने पहिले पाऊल म्हणून “एम.ए अभिजात मराठी” या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.
मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर यांच्या अथक प्रयत्नातून पहिल्यांदाच रिद्धपुर येथील मराठी भाषा विद्यापीठात एम.ए अभिजात मराठी हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये प्रशासकीय स्तरावर हा अभ्यासक्रमास मा.कुलगुरूंनी मान्यता प्राप्त करून घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग आता खुला झाला आहे.
मराठी भाषेला २००० वर्षांचा इतिहास आहे, त्यामुळे मराठी ही अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे या विद्यापीठात प्रथमच अभिजात भाषा व मध्ययुगीन मराठी वाङ्ममय हा स्वतंत्र विभाग माननीय कुलगुरूंच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मराठीच्या प्रारंभ काळापासून ते वर्तमान काळापर्यंत मराठीची भाषिक रुपे आणि मध्ययुगीन मराठी साहित्य अभ्यासता येणार आहे.
एम.ए अभिजात मराठी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची विद्यापीठातून तयार होणारी पहिलीच तुकडी असेल, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा.
प्रवेशाकरिता खालील लिंक वर जाऊन फॉर्म भरण्यात यावा. नंतर विद्यापीठाकडून आपणास संपर्क करण्यात येईल.
https://surveyheart.com/form/673b364c2b9cb077c20041f1
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. ह्या अभ्यासक्रमांसाठी हार्दिक शुभेच्छा