Thursday, December 26, 2024
Homeपर्यटनमेरा जूता हैं जपानी… : ३

मेरा जूता हैं जपानी… : ३

विकास आणि पर्यावरण

मात्सूमिटो हून आम्ही एक तास छान वनराजीतून प्रवास करून ओगीझावा बस स्टेशन ला पोहोचलो.

वरकरणी हे रेल्वे स्टेशन सारखेच दिसते. एका मागोमाग तीन बस उभ्या होत्या. आमचा २२ जणांचा ग्रुप असल्याने
एका बस मधील अर्धी जागा आमच्याच ग्रुपने व्यापली होती. या बस ला “टनेल इलेक्ट्रिक बस” म्हणतात.

आजचा दिवस म्हणजे जपान मधील अभियांत्रिकी आश्चर्य पाहण्याचा आणि विकास व पर्यावरण याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलण्याचा असावा. योगायोग म्हणजे ५ जुन रोजी जागतिक पर्यावरण दिन होता. त्या निमित्ताने विकास आणि पर्यावरण याचीं कशी उत्तम सांगड घालता येते, ते प्रत्यक्ष पहायला मिळाले.

ही इलेक्ट्रिक बस पूर्णपणे पंधरा मिनिटे बोगद्यातून जाते. तसेच इलेक्ट्रिक वर चालते म्हणून टनेल इलेक्ट्रिक बस. विशेष म्हणजे हा बोगदा ही इतका मोठा आहे की, एकावेळी दोन्ही बाजूंनी बसेस जा ये करू शकतात.

या पंधरा मिनिटांच्या बोगद्याच्या प्रवासानंतर आम्ही कुरोबे डॅम स्टेशन ला पोहोचलो. जवळपास दोनशे पायऱ्या थांबत थांबत आम्ही वर पोहोचलो आणि तिथून कुरोबे धरणाचे अत्यंत विस्मयकारी बांधकाम पाहून चकित झालो.
हे ही एक अभियांत्रिकी आश्चर्य आम्ही पहात होतो. जिथे नजर जाईल तिथे तिथे नकळत फोटो काढल्या जात होते. प्रेक्षक गॅलरीतून आम्ही धरण बघून वळणावळणाच्या पायऱ्या उतरत प्रत्यक्ष धरणावर आलो.

हे धरण, टनेल इलेक्ट्रिक बस प्रोजेक्ट पूर्ण करणाऱ्या कंपनीचा निर्धार तिथे वाचायला मिळाला. कंपनी ने लिहिले आहे, “या प्रकल्पाला २०१५ साली ५० वर्षे झाली आहेत. आम्ही हा प्रकल्प गेली ५० वर्षे उत्कृष्टरित्या जतन करून ठेवला आहे आणि आम्ही निर्धार करतो की, पुढील ५० वर्षे हा प्रकल्प आम्ही असाच जतन करून ठेवू.” इथे कॉफी घेत घेत सर्व लोक छानपैकी बसून सर्व धरण पाहू शकतात. तसा आस्वाद आम्ही सुध्दा घेतला.

टनेल केबल कार मधून काढलेले व्हिडिओ

धरणाच्या भिंतीवरून चालत चालत आम्ही टनेल केबल कार स्टेशन वर आलो. एरव्हीच्या केबल कार या संपूर्ण डोंगर दऱ्या पहात नेणाऱ्या असतात. पण ही टनेल केबल कार ही पूर्णपणे १० मिनिटे बोगद्यातून प्रवास करून खालून वर घेऊन जाते. वर गेल्यावर दुपारचा एक वाजल्याने आम्ही सोबत घेतलेले सँडविच आणि पराठे असे जेवण तिथे घेतले.

जेवणाच्या ठिकाणा जवळच केलेल्या एका जागेतून अवती भवती चे बर्फ आच्छादित डोंगरदऱ्या पाहू ¡न आमचे डोळे दिपून गेले. आम्ही खुप फोटो काढले जणु काश्मिर मध्ये असल्यासारखं वाटले. मनसोक्त तिथे आम्हीं फोटो काढले.

तिथून परत दुसऱ्या केबल कार ने आम्ही टायेसमा स्टेशन वर आलो. तिथून बस ने एक तास प्रवास करून कानाझावा येथे संध्याकाळी सहा वाजता पोहोचलो.

आजचा आमचा मुक्काम हयात हॉटेल मध्ये होता. आठव्या मजल्यावर असलेल्या रूम मधून बाहेरच्या आखीव रेखीव शहराचे दृश्य खूपच सुंदर दिसत होते. जणू काही नवें कोरे करकरीत शहर वसविण्यात आले आहे !
क्रमशः

देवेंद्र भुजबळ

— लेखन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ +919869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. जपानमधील अभियांत्रिकीकी आश्चर्य आणि भुजबळ सरांचं लेखन कौशल्य चकीत करणारं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !
आनंद प्रभाकर महाजन. on शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
सौ.मृदुलाराजे on असे होते साने गुरुजी
अरुणा मुल्हेरकर on माझी जडणघडण – २९