Sunday, July 20, 2025
Homeसाहित्ययोग : काही कविता…

योग : काही कविता…

आज आंतरराष्ट्रीय योगदिन आहे. योग ही भारताची जगाला अनमोल अशी देणगी आहे. या निमित्ताने योगाची महिती सांगणाऱ्या काही कविता सादर करीत आहे.
योग दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा. नियमित योग करू या आणि निरोगी राहू या.
— संपादक

१. योग

सुसंवाद व्हावा
तना मनाचा
होई समतोल
चंचल विचारांचा

मनासी असावा
ध्यास योगाचा
निर्मल निरामय
आनंदी जीवाचा

योगासन धर्म
नव्हे  विज्ञान
आत्म भानाचे
आपसूक ज्ञान

तोल सांभाळावा
योग जुळवावा
ध्यान धारणा
ओंकार साधना

अष्टांग योगाचा
सन्मान करावा
मन शांतीचा
मार्ग चोखाळा

— रचना : मीरा जोशी.

२. ‘योगासन मंत्र’

योगासन हा मंत्रच मोठा, जगण्याला वरदान
त्याच्यासाठी वेळ काढू या राखुनी आता भान ||

शरीर होते सुदृढ आणि मनास लाभे शांती
योगासन ही आरोग्यातील बहुमोलाची क्रांती
कार्यक्षमता नित्य वाढते थकवा पळून जाई
अनुभव येतो साधकास हा रोजच ठाई ठाई
यशस्वी जीवन करण्यासाठी ज्याची साथ महान ||

साधन काही लागत नाही असा गुणी व्यायाम
लाभ किती वर्णावे त्याचे सांगू किती आयाम
प्राणशक्तीचा रक्षक हा तर करू या त्याची भक्ती
ध्यानधारणा नित्य साधना यातून मिळते शक्ती
वेळेवरती भूक लागते अचूक वेळी तहान ||

मेंदूस ठेवी सदैव ताजा, रक्त राखितो शुध्द
उमेद देतो लढण्यासाठी जीवनरूपी युध्द
व्यसनांनाही दूर रोखीतो आपल्यापासून फार
देतो सहजच हातात आपल्या अमृतरुपी धार
योगासन हे चंदन आपण व्हावे त्याची सहाण ||

म्हणे मुरारी होऊ सारे योगासन करणारे
प्राणवायूचा भक्कम साठा घेऊनिया फिरणारे
विश्वासाठी अमूल्य आमची हीच देणगी मोठी
योगगुरु अन विश्वगुरुचे कौतुक अगणित ओठी
विश्वामध्ये योग क्रांतीचा आम्हाला बहुमान ||

— रचना : मुरारी देशपांडे.

३. आरोग्यमंत्र

प्रांत:काळी उठोनिया
नित्य योगासने करू
सारी दुःखे बाजू सारू
आरोग्याला आधी स्मरू

वृक्षवल्ली करू संवर्धन
आरोग्याचे करू या रक्षण

जैसे हवे पोटास अन्न
तैसे योगाने राहू प्रसन्न

एकमेका साथ देऊ
आरोग्याचा मंत्र घेऊ

एक दोन तीन चार
योगासनांचा करू विचार

पाच सहा सात आठ
योगासनांचा करू परिपाठ

नऊ दहा अकरा बारा
रोगमुक्त करू भारत सारा

— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई

४. योग श्वसन ..

वारसा हा भारताचा
शास्त्रशुध्द योगासन
नियमित  करा  योग
रे शुध्द होईल श्वसन

जाणून घे सत्व तत्व
उचीत घ्यावे आसन
तन मन  एकाग्र हवे
नसेनाभले सिंहासन

उरकायचे काम नसे
नसावे असे  प्रहसन
कर्मयोग जाण खरा
करावे हे मनापासून

वेळ हवी  ठरवलेली
ठेवायचे चित्त प्रसन्न
घ्यावे  शांत समजून
चौरस आहार  अन्न

पळेललांब घाबरून
सकलरोग दुःशासन
जाणा अमृत कलश
रहा तया  आश्वासून

पटू लागले महत्व हे
सांगे जेंव्हा प्रशासन
योग दिन  उत्साहात
चालू आता ते जशन

— रचना : हेमंत मुसरीफ. पुणे

— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. योग दिनानिमित्त ‘योग’ विषयावरील कविता हा उत्तम विषय आपण हाताळलात. सर्वच कविता छान आहेत.
    यामुळे योग विषयक जागरूकता वाढण्याची शक्यता वाटते!

  2. योगा दिनानिमित्त शुभेच्छा 👍, सर्वच कविता उत्तम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माध्यमभूषण याकूब सईद
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on आनंदी जीवनासाठी समतोल आवश्यक – देवेंद्र भुजबळ
कविता बिरारी on मम गाव राहिले दूर…..
प्राची उदय जोगळेकर on सांगा, कसं जगायचं ?