Saturday, July 27, 2024
Homeसाहित्यवाचक लिहितात...

वाचक लिहितात…

नमस्कार मंडळी.
नुकतीच, आपल्या नवं वर्षाला सुरुवात झाली आहे.नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

साने गुरुजींचे आवडते विद्यार्थी राहिलेले आणि पुढे जीवनभर त्यांचा वसा चालवणारे ,हुंडा प्रतिबंधक चळवळीचे जनक मामासाहेब कुलकर्णी यांच्या कन्या, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आशाताई कुलकर्णी या आपल्या पोर्टलवर लिहित असलेल्या “साने गुरुजी: परिचित अपरिचित” या लेख मालेस छान प्रतिसाद मिळत आहे. ज्यांनी ही लेख माला वाचली नसेल, तर त्यांनी ती अवश्य वाचावी.

गेल्या काही दिवसात प्राप्त झालेल्या वाचकांच्या प्रतिक्रिया पुढे देत आहे.
आपला
देवेंद्र भुजबळ
संपादक


“सानेगुरुजी परिचित – अपरिचित”
तुम्ही लिहिलेला प्रत्येक भाग वाचनीय आहे. खरेच अपरिचित साने गुरुजी कळायला मदत होते आहे. मी हे प्रत्येक भाग जपून ठेवत आहे.

  • – जगदिश काब्रे विचारवंत, लेखक आणि विज्ञानाचे गाढे अभ्यासक.


पुज्य साने गुरुजीं विषयावर आपण लिहिलेले पांच लेख वाचले. गुरूजींना अभिप्रेत चांगल्या शाळेची संकल्पना, गरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली कणव दिसते. सामाजिक कार्यकर्ते, देशप्रेमी नागरिक, तसेच रंजल्या गांजलेल्या आपलं मानणारा, भेदभाव न मानणारा समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य आपल्या लेखनातून अधोरेखित झाले आहे. आजच्या काळात तर असं संवेदनशील व्यक्तीमत्व पहावयास मिळत नाही. लेख वाचताना समर्पित जीवनाची कल्पना येते.

  • – प्रदीप पंडित, अंधेरी, मुंबई.


साने गुरुजी…..
खरोखरच अपरिचित माहिती मिळाली.

  • — संतोष गोरे, नगर.


सानेगुरुजी परिचित – अपरिचित
भाग पहिला….
खूपच छान झालाय हा लेख…! माहितीपूर्ण.
पुढील भाग वाचण्याची उत्सुकता वाढवणारा.
— एकनाथ आव्हाड, बालकवि आणि बालकथाकार,
साहित्य अकादमी सन्मानित साहित्यिक.


धर्मनिरपेक्षता व सर्वधर्मसमभाव समजून घेऊन ,ही तत्वे आचरणारा संत म्हणजे पू.साने गुरुजी.
— प्रा. रेखा नाबर. माहिम, मुंबई.


साने गुरुजींच्या सर्व भागांचे हार्दिक स्वागतच आहे, सर्वच भाग एकाहून एक सरच आहेत

  • अनंत बोरकर. विचारवंत, लेखक छ. संभाजीनगर


  • गुढी पाडव्याच्या कविता छानच. मनःपूर्वक अभिनंदन ! 💐💐
    अरुणा गर्जे… नांदेड


“पूर्णिमानंद” चे स्वागत आणि कवयित्रीचे मनःपूर्वक अभिनंदन. राधिकाताई भांडारकर ह्यांचा “गुढी पाडव्याचे महत्व” लेख खूप छान आहे. 🙏🌹

  • — सौ मृदुला राजे, जमशेदपूर


नमस्कार सर,
‘आईनस्टाईनचा देव’ मा. सुनील देशपांडे यांनी लिहिलेला लेख खरोखरच खूप सुंदर आणि विचार सुद्धा मनाला पटण्यासारखे. सर्वांनीच असा विचार करून जीवन जगले तर स्वतःचे आणि इतरांचेही आयुष्य खूप सुखी आणि आनंदी होईल. एवढा सुंदर आणि अमर्याद निसर्ग आहे की निसर्गात जळी स्थळी काष्ठी पाषाणी आपल्याला देवाचे अस्तित्व नक्कीच जाणवेल. फक्त शोधता आले पाहिजे.🙏💐

  • — अरुणा गर्जे, नांदेड

१०
“आईन्स्टाईनचा देव” खूपच भावला. अगदी खरंय.

किरण ठाकूर आणि किरण ठाकुर लेख खुसखुशीत शैलीत लिहिलेला माहितीपूर्ण लेख वाटला. शेक्सपियरच्या वाक्याला एकदम छेद देणाराच!

साने गुरुजींच्या लेखामुळे एकदम बालपणात विहार झाला. गोड गोष्टींच्या विश्वात रमणे आठवून छान वाटले. धन्यवाद आशाताई.

तोरणे जी चांगली पुस्तकं आणतात. दवणे यांचे हे पुस्तक आवडण्यासारखेच आहे.
गुढी पाडव्याच्या कविता चांगल्या आहेत.

  • — स्वाती वर्तक, मुंबई.

११
माननीय तोरणे सर,
नमस्कार.
आपण पाठविलेल्या प्रत्येक पुस्तकाचे परिक्षण मी आठवणीने व आवडीने वाचत असते.मला ते खूप आवडते. आपण लिहिलेले परिक्षण वाचून ते ते पुस्तक वाचनाचा आनंद मिळतो.
खूपच छान व धन्यवाद !
आपण म्हटल्याप्रमाणे हल्ली २०/२५ वयातील मुले मराठी पुस्तके वाचतच नाहीत. कारण त्यांचे शिक्षण ईंग्रजी माध्यमातून होत असल्याने त्यांना मराठी वाचनाचा साहजिकच कंटाळा येतो. हा माझा स्वानुभव आहे.
— स्नेहलता सोनवणे, नासिक.

१२
श्रीमान सुधाकर तोरणेजी, नमस्कार !!
“जीवश्च कंठश्च” या पुस्तकाचे आपण केलेले परीक्षण वाचले. अष्टपैलू लेखक प्रा.प्रवीण दवणे यांची बालवाङ्गयावरील काही पुस्तके मी वाचली आहेत.

पु.ल.सुधीर फडके, गदिमा, यांच्या विविध साहित्यिक पैलूंचे दर्शन प्रा.दवणे यांनी सदर पुस्तकात विस्त्त्रुतपणे घडविले असले तरी आपण केलेले परीक्षण वाचल्यावर मूळ पुस्तक न वाचता या तिघा महान लेखक, कवी, संगीतकार इ.हे सर्व अलौकिक होते. झालेत बहू, आहेत बहू, होतील बहू परंतूया सम हेच !!
तोरणेजी आपण विविध पुस्तकांचे परीक्षण केलेले आहे. मराठी भाषेवर आपले जबरदस्त प्रभुत्व आहे. सर्व पुस्तकांचे (47&4) परीक्षण रसिकांना वाचता येईल असे पुस्तकआपण लवकरच प्रसिद्ध करावे ही विनंती.
— आपला स्नेहाभिलाषि. अनंत वाणी.

१३
सुमेध वडावाला अफाट शब्दांकन करतात.
मी दोन वेळा त्यांची मुलाखत घेतली आहे. दिलीप गडकरी सुंदर लिहितात. कर्जतला रहातात आणि अफाट प्रेम साहित्या विषयी.

  • — प्राची गडकरी, मुंबई

१४
दिलीप गडकरी सरांनी करून दिलेला “मिट्ट काळोख… लख्ख उजेड” ह्या पुस्तकाचा परिचय अतिशय सुंदर आणि पुस्तक वाचण्याची उत्कंठा जागवणारा आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.

अरुणाताई दुद्दलवार ह्यांचे लेखन नेहमीच खूप सुंदर असते. हे लेख सुद्धा अतिशय सुंदर
सर्वच लेख व कविता खूप छान आहेत.

  • — सौ मृदुला राजे. जमशेदपूर.

१५
खूप छान प्रवास श्रीखंडे सरांचा.
— सौ. मेहमूदा शेख (गुलपरी). श्रीक्षेत्र देहूगाव, पुणे

१६
पालकत्व – एक कला
भाग ९ “कौमार्य अवस्था” खूप छान प्रबोधनपर लेख.
अरुणा गर्जे. नांदेड

१७
जीवन सुंदर आहे..
हा लेख खूप सुंदर लिहिलात अरुणा ताई !!
– डाँ.प्रभा वाडकर.

— टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शितल अजय अहेर on हलकं फुलकं
डाॅ.सतीश शिरसाठ on विनोदी कथा
Shilpa Kulkarni on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ ,मेकअप आर्टिस्ट on हलकं फुलकं
शितल अजय अहेर on मुक्ती
डाॅ.सतीश शिरसाठ on साहित्य तारका : ५३
अजित महाडकर on माझी जडणघडण भाग – ८