अन्वय व्यसनमुक्ती केंद्राच्या नवीन ओपीडीचे उद्घाटन उलवे येथील बोन ॲण्ड जॉईंट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे प्रमुख प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉक्टर विजय कारंडे यांच्या शुभहस्ते त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये नुकतेच संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, “माझा व्यायाम, योगासने, प्राणायाम यावर विश्वास आहे. मी स्वतः सकाळी साडेपाचला उठून या गोष्टी करतो. माझं तर मत असं आहे की पेशंटला रोज एक- दीड तास स्वतःसाठी वेळ दिला तर डॉक्टरांची गरजच भासणार नाही. बिझी तर सगळेच असतात पण आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. आज ताणतणावामुळे तरुण व्यसनांचे वळतात. व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी ध्यान,योगा आणि व्यायाम उपयुक्त ठरतो.” असे डॉ कारंडे पुढे म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते वसंतराव वळकुंडे, मनीषा वळकुंडे, अन्वयचे अनिल लाड, वृषाली मगदूम, उदय तळवे, उमा वैद्यनाथन, प्रज्ञा बडवे, नयन म्हात्रे, हे उपस्थित होते.
अन्वय चे प्रमुख डॉ अजित मगदूम यांनी व्यसनमुक्ती समुपदेशनासाठी विनाशुल्क ओपीडी उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉक्टर विजय कारंडे यांचे आभार मानले.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800