Sunday, March 23, 2025
Homeलेखसायबर सुरक्षितता : काळाची गरज

सायबर सुरक्षितता : काळाची गरज

नमस्कार मंडळी.
आजकाल “सायबर सुरक्षा” खूप गहन होत चाललेला प्रश्न आहे, म्हणुन या बाबतीत आपल्याला राष्ट्रीयकृत बँकेचे निवृत अधिकारी, श्री देवदत्त नागपुरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना संगीताची आणि स्टेजवर हिंदी, मराठी – फिल्मी गाणी व भावगीते गात गायनाची लिखाणाची आवड आहे. न्यूज स्टोरी टुडे परिवारात श्री नागपुरे यांचे हार्दिक स्वागत आहे.
— संपादक

सायबर सुरक्षितता म्हणजे डिजिटल हल्ल्यापासून डेटा, नेटवर्क आणि प्रोग्राम चे संरक्षण करण्याची पद्धत होय. यालाच माहिती तंत्रज्ञान सुरक्षा किंवा इलेक्ट्रॉनिक माहिती सुरक्षा असेही म्हणतात.

सध्या सायबर फसवणुकीचे बरेच प्रकार वर्तमानपत्रे, टीव्ही व इतर माध्यमातून वाचावयास व पहावयास मिळतात. यातून तरुण, वृद्ध, पुरुष, महिला कुणीही वाचू शकत नाही. आपल्याला कोण फसवत आहे हे जसे समजत नाही तसेच फसवणाऱ्याला सुद्धा आपण कुणाला फसवत आहोत ते सुद्धा कधी कधी समजत नाही. यामध्ये बरेच लोक अज्ञानामुळे फसवले जातात. काही तरुण झटपट पैसे मिळवण्याच्या आमिषाला बळी पडून हव्यासापायी सर्व आयुष्याची पुंजी गमावून बसतात. या साठी सर्वांनी काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे.

सायबर सुरक्षितता अर्थात No Sharing. पासवर्ड, ओटीपी आणि वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नये. स्कॅमर्स च्या जाळ्या मध्ये अडकू नये यासाठी स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेची जबाबदारी स्वतःच घ्यायला हवी. कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणाऱ्या शेअर मार्केटच्या सौद्यांना आणि भूलथापांना बळी पडू नये.

Scamers वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करत असतात. काही प्रकार येथे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे…

डिजिटल अटक (arrest) सारख्या फसव्या धमक्याना घाबरून पैसे ट्रान्सफर करू नये. डिजिटल अटक म्हणजे आपल्याला एखादा फोन येतो आणि असे भासवण्यात येते की फोन करणारा वरिष्ठ पोलीस अधिकारी आहे आणि तो फोन द्वारे घाबरवण्याचा प्रयत्न करतो आणि पैसे ट्रान्सफर करायला सांगतो. अशा धमक्यांना न घाबरता जवळच्या पोलीस ठाण्यावर जाऊन त्यांची मदत घेऊ शकता.

हेल्प लाईन :
सायबर फसवणूक झाल्यास, घाबरण्याची गरज नाही. यासाठी हेल्प लाईन फोन नंबर 1930 उपलब्ध आहे.

सायबर फसवणूकी मध्ये भावनिक ब्लॅकमेलिंग सुद्धा होऊ शकते. उदाहरणार्थ अशा प्रकारचे फोन येतात की तुमचे अमुक नातेवाईक एक्सीडेंट ने ऍडमिट आहे. त्यांचा त्वरित ऑपरेशन करणे आवश्यक आहे. तर तुम्ही त्वरित पैसे ट्रान्सफर करा. चुकीची लिंक वगैरे पाठवून तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्ही खात्री करताना असे आढळून येऊ शकते की तुमचा नातेवाईक सुरक्षित आहे. भावनेच्या आहारी जाऊन फसवणूक करून घेऊ नका.

चुकीचे अँप :-
आपल्या मोबाईल मध्ये चुकीचे अँप डाउनलोड करू नये. केले असतील तर ते लगेच डिलीट करून टाका. अनोळखी लिंक उघडू नका. सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर 1930 वर फोन करून कंप्लेंट करू शकता.

आपल्या बँकेचा केवायसी अपडेट करण्यासाठी कधी टेलिफोनवर माहिती देऊ नये. अश्या प्रकारचा फोन केलाच तर सांगावे की, आम्ही आमच्या बँकेत जाऊन केवायसी अपडेट करू आणि प्रत्यक्ष बँकेत जाऊन अपडेट करणे.
डॉक्युमेंट शिवाय लोन देण्याची प्रलोभने दाखवले जातात त्यापासून दूर राहणे. कर्ज हवे असतील तर प्रत्यक्ष बँकेत जाणे योग्य आहे.

ज्येष्ठ नागरिक रिटायरमेंट नंतर बरीच वर्ष तंत्रज्ञानापासून दूर असतात. नवीन तंत्रज्ञान त्यांना अवगत असण्याची शक्यता फार कमी असते व पैसे पण अकाउंट मध्ये पडून असतात. त्यावर चोरांचा डोळा असू शकतो.

पोलीस खाते आणि ज्येष्ठ नागरिक संघ विविध प्रकारच्या मीटिंग घेत असतात, जेणेकरून सर्वाना त्यातून ज्ञान मिळू शकते. टीव्हीवर आणि वृत्तपत्रासारख्या अनेक माध्यमातून घर बसल्या सुद्धा काही विशिष्ट कार्यक्रम मार्फत या संदर्भात ज्ञान मिळू शकते.

ग्रेसफुल लिव्हिंग :-
आज अनेक संस्था विविध प्रकारचे सेमिनार व वेबिनार आयोजित करत असतात. त्यांचा आपण लाभ घेतला पाहिजे व त्यातून मिळणारे सायबर सुरक्षिततेचे ज्ञान आपल्या सुरक्षेसाठी वापरले पाहिजे आणि इतराना माहिती सांगितली पाहिजे.

शेवटी आपली सुरक्षेची प्राथमिक जबाबदारी आपलीच आहे. तरीही फसवणूक झाली तर सायबर पोलीस खाते आपल्याला मदत करण्यासाठी आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडिया सतत प्रचार करत असते की जाणकार बना आणि सतर्क रहा. हीच माहिती कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून अमिताभ बच्चन सतत देत असतात.

सायबर सुरक्षितता ही काळाची गरज आहे हे पक्के जाणून घेऊया.
आपण सर्वानी निश्चय करूया की आपण जाणकार बनूया आणि सतर्क राहुया. सायबर गुन्ह्या पासून दूर आणि सुरक्षित राहुया.
जय हिंद.

— लेखन : देवदत्त नागपुरे. नवी मुंबई
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments