Friday, January 3, 2025
Homeबातम्यासावित्रीच्या लेकींची अनोखी वटपौर्णिमा

सावित्रीच्या लेकींची अनोखी वटपौर्णिमा

निसर्गाप्रती असणारी आस्था आणि प्रेम हे देखील एखाद्या संवेदनशील मनाचं मोठेपण दर्शवितं आणि तीच आस्था आणि प्रेम हे एखाद्या संपूर्ण परिवाराच्या हृदयात सामावलेलं असणं हा दुर्मिळ योगायोगच म्हणावा लागेल.

ह्याचे एक उत्तम उदाहरण नुकतंच पाहायला मिळालं पर्यावरण वर वन्यजीवप्रेमी श्री.राजू मुंबईकर यांच्या सहचारिणी निसर्गप्रेमी सौ.राजश्री मुंबईकर यांच्या रूपानं. हिंदु संस्कृतीत वर्षाऋतूतील जेष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस सर्व भगिनीं वटपौर्णिमा म्हणून साजरी करतात. ह्या दिवशी सर्व विवाहित महिला आपल्या पतीला उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभावं या करिता वटवृक्षाची मनोभावे पूजा अर्चना करतात.

अध्यात्मिक दृष्टीने जेवढे महत्व ह्या सणाला आहे तितकेच महत्त्व वैज्ञानिक दृष्टीकोनातून सुध्दा या सणाला आहे . कारण एक वटवृक्ष दिवसाला शेकडो जणांना ऑक्सिजन देतो, निर्मलछाया देतो आणि हेच पर्यावरणपूरक महत्व जाणून एक नवं संकल्प मनाशी बाळगून अध्यात्माला वैज्ञानिक आधार देत सौ. मुंबईकर, सौ.रोहिणीताई पांडूरंग मुंबईकर, सौ.भारतीताई वैजनाथ मुंबईकर, सौ.सुजाताताई प्रविण कडू या आधुनिक युगातील सावित्रीच्या लेकीनी आपल्या पतीराजांच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या मनोकामनेसाठी सोबतच साता जन्मांच्या सोबतीसाठी तब्बल २१ वटवृक्षांची लागवड करण्याचा अनोखा नवं संकल्प करत उरण जवळील वेश्वी गावातील एकवीरा देवी मंदिराच्या पायथ्याशी श्री.राजू मुंबईकर यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या रॉक ॲनिमल पार्क मध्ये सलग चार वर्षे वटवृक्षांच्या झाडांची लागवड करून वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येत आहे.

ह्या अनोख्या अश्या पर्यावरणपूरक वटवृक्ष लागवड कार्यक्रमा करिता सहभागी झाले होते ते निसर्गप्रेमी श्री.राजू मुंबईकर साहेब, केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. स्नेहलजी पालकर श्री.अनिल घरत (उरण तालुका सचिव – आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य) आणि निसर्गप्रेमी बच्चे कंपनी.
सण – संस्कृती सोबतच विज्ञानाची कास धरणाऱ्या ह्या सवित्रिंच्या लेकींनी पर्यावरणाच्या संरक्षणा सोबतच ह्या मानवजातीला ऑक्सिजनरुपी नवंसंजीवनी देणाऱ्या ह्या शतायुषी महावृक्षांची लागवड करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे आणि म्हणूनच ह्या अनोख्या पद्धतीने निसर्गा सोबतच पर्यावरणपूरक धाग्याची विण विनत नैसर्गिक, धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून महत्त्व असणार्या वटवृक्षांची लागवड करून वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या निसर्गप्रेमी सवित्रिंच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केलं जातं आहे.

अनिल घरत.

— लेखन : अनिल ज. घरत. पिरकोन- रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खुप सुंदर वटपौर्णिमा
    …मी ही 12 झाडे लावली..
    सोनचाफा
    निम
    पारिजात
    फणस
    रातराणी
    आपला उपक्रम खरच स्तुत्य आहे…

  2. चांगला उपक्रम
    वडाचे आयुष्य हापसेंन्च्यूरी वर्षा पर्यंत टिकते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Pratibha Saraph on नव वर्ष ..
आशी नाईक on कवी
विजय सूर्यकांत लोखंडे विभागीय अधिकारी सोलापूर महानगरपालिका on शासकीय अधिकारी संमेलन : माझा लाभ !