Sunday, June 1, 2025
Homeलेखहवा हवाई : ३३

हवा हवाई : ३३

जनकपुरीतील नाटक : एक किस्सा …

..ते संवाद अजून आठवतात…
लग्नाची बेडी नाटकात रश्मी सिनेनटीशी लग्न केले की तिच्या पैशावर चैन करता येईल म्हणून स्वप्ने पहायला ब्रह्मचारी अवधूत लागतो. एकदा मी अवधूत होतो.
… काहो मी तर ऐकले होते की नटीच्या जिवावर तिचे नवरे मजेत जगतात? पण जेव्हा तिचे बूट पॉलिश करायचे व इतर नखरे सांभाळायचे काम करायची वेळ येते. ते म्हणतात… घी देखा पर बडगा नही देखा…!
… खूप पूर्वी ५ लग्ने झालेला गोकर्णाची भूमिका मी आणि त्यांची पत्नी गार्गीची भूमिका सौ अलकाने केली होती..नंतर अशा भूमिका नाटकात करत असू…

“तो मी नव्हेच” मधला राधेश्याम महाराज — म्हणजे रंगभूमीवरच्या बहुरंगी ढोंगाचा उत्कट अविष्कार! लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणारा, गोडगोड बोलून गाठी सोडवणारा, आणि शेवटी “माझा काही संबंध नाही…” म्हणत पडदा टाकणारा! तो साकारताना किती वेळा प्रेक्षक खदखदून हसले असतील, ह्याचा अंदाज येतो.
… मी ही भूमिका साकारली,
काही संवाद आठवले…
राधेशाम महाराज …किती वेळा सांगायच भगवंताला… अरे मी आहे ना पृथ्वीतलावर … !
भगतगण… आता हे भगवंत कोण हो महाराज…?
राधेशाम महाराज… अरे आपले विष्णू रे… कितीदा सांगितले… कशाला गरूडावर टांग मारून पृथ्वीवर धावाधाव करता… लक्ष्मी कडून पाय चेपून घ्या…! मी इकडचे पाहतो सगळ … काय खर आहे कि नाही…?
राधिका शिष्या … इश्श…!

गुलाम नावाचे नाटक नवी दिल्लीत बृहन महाराष्ट्र मंडळ नाट्य स्पर्धेत जनकपुरी महा. मंडळातर्फे आम्ही सादर केले होते. त्याचे एक वैशिष्ठ्य होते की माझ्या पात्राच्या पत्नीचे काम माझ्या आईने मंगला ओक यांनी साकार केले होते. या नाटकाचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे ज्योतिषाच्या आहारी जाऊन नायक जीवन उध्वस्त करून घेतो.
माझ्या जीवनात नाडी भविष्य विषयाने प्रवेश केल्याचे आईने ऐकल्यावर तिने गुलाम नाटकाची आठवण करून दिली की रंगमंचावरून ज्योतिषाच्या मोहात पडू नका असा संदेश तू प्रेक्षकांना दिला होतास… !
मी आईला म्हटले होते …
तो नायक माझे उद्या काय होणार या चक्रात अडकला होता. … या उलट मी नाडी भविष्याचे गूढ समजून घ्यायला मागे लागलोय. हे कोण महर्षी, ज्यांनी अजून जन्म घेतलेला नाही, अशांची नावे जन्म दिनांक, अवकाशातील ग्रहमान कसे असेल, वगैरे मानवी बुद्धीला न समजणारे ज्ञान त्यांना कुठून आले? मला व्यक्तींचे ताडपत्रावर तमिळ सारख्या अगम्य भाषेत, लिपीत का लिहून ठेवले आहे… वगैरे… प्रश्नांची उत्तरे शोधावीशी वाटतात!
क्रमशः

— लेखन : विंग कमांडर शशिकांत ओक. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माधव गोगावले : कोरेगाव बुद्रुक ते शिकागो !
Shashikant Oak on कथा : २
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on काही कविता
उज्ज्वला केळकर on ‘स्नेहाची रेसिपी’ – १७
सौ. वर्षा महेंद्र भाबल. on स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनक्रम