१
दगड हाती घेत दगडावर त्याचे वज्र प्रहार पडू लागले, नक्षीदार कोरल्याने शिल्प तयार झालेले.
तो समाधानी नव्हताच, संभ्रमात होता नावाच्या.
इतक्यात लोकांनीच त्या शिल्पात भाव ओतले.
अस्तित्व मान्य करून…..!!
२
परिमळ सर्वांगाला लागल्याने तो खूष, चंदनाचे गुणगान गात होता.
खोड झिजलेलं चंदनाला कळलंच नाही.
३
तुफानी वादळात फांदीने झाडाचा आधार सोडलेला.
झाड कोसळल नाही, कणखरपणे उभ राहिलं.
४
अक्षराशी सूर जुळवताना, शाईने लेखणीला हाताशी धरलं.
कागद रंगीबेरंगी झाला. शब्दांचे वजन वाढलेले.

— लेखन : सौ माधवी ढवळे. राजापूर, जि: रत्नागिरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800