Tuesday, June 17, 2025
Homeपर्यटनअप्रतिम परंबीकुलम - भाग - २

अप्रतिम परंबीकुलम – भाग – २

मासानी अम्मन देवी
नमस्कार, वाचक हो.
सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सफारीची वेळ असल्यामुळे विविध रमणीय स्थळे पाहून साधारण ३ ते ३.३० पर्यंत जंगल सफारी संपते. त्यामुळे सकाळी जो अगोदर लवकर जातो त्याचा अगोदर नंबर लागतो. जायला जरा जरी उशिर झाला तरी हात हलवत परत यावे लागते. पण हे टाळण्यासाठी अगोदर बुकिंगही करता येते. एका दिवसाची तरीही आठवणीत राहील अशी ही यात्रा होते.

जंगल सफारी करून पुन्हा संध्याकाळी परत येताना पोलाचीमध्ये नाष्टा, कॉफी (टिपिकल फिल्टर कॉफी बर का☺️) घेऊन घरट्याकडे परतायचे.

पण.. परत येताना आपण अजून एक सुंदर गोष्ट पाहू शकतो.. ते म्हणजे पोलाचीपासून जवळच असलेले देवीचे मंदिर. या मंदिराविषयी आपण आज थोडेफार जाणून घेणार आहोत…..

Masani amman kovil – मासानी अम्मन देवीचे अप्रतिम मंदिर. पारंपरिक बांधकाम, प्रशस्त आवार दाक्षिणात्य मंदिराचे वैशिष्ट्य दाखवते.

देवीची सुंदर, अद्वितीय – भव्य दिव्य मूर्ती झोपलेल्या स्थितीत येथे आहे. चार हातांपैकी एका हातात डमरू, एका हातात सर्प, एका हातात त्रिशूळ आणि एका हातात खोपडी आहे तर पायामध्ये राक्षसाला मारले आहे. शक्तीचा अवतार म्हणजे ही देवी.
मंगळवारी आणि शुक्रवारी इथे जास्त भाविक येतात.

अशी मान्यता आहे की देवीच्या आसपासही गेलो तरी मानसिक शांती लाभते, देवीचा वर मिळतो. मानसिक रोगही देवी बरी करते, भक्तांना शांतता देते, शारीरिक व्याधी कमी करते.

भक्तीभावाने जाणाऱ्या भक्तांची गाऱ्हाणी ऐकून त्यांना न्याय देणारी देवी म्हणून मासानी अम्मा प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच देवीला न्यायाची देवी असे म्हणतात.

या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे.
जर कुठल्याही भक्ताला काही अडचण असेल, कोण त्रास देत असेल, कोणी फसवले असेल वा चोरी झाली असेल किंवा इतरही काही अडचणी असतील अम्मा दूर करते. त्यासाठी एक गोष्ट करावी लागते.. ती म्हणजे लाल सुकलेल्या मिरच्या घेऊन वाटायच्या आणि आपली इच्छा काय असेल ते बोलून प्रतिकात्मक देवीला म्हणजे न्यायाच्या दगडाला त्या वाटलेल्या मिरचीचा लेप लावायचा. देवी ती इच्छा पूर्ण करते, भक्तांच्या पाठीशी उभी राहते, असेल त्या संकटातून मुक्त करते..

मग.. तुम्ही परंबिकूलम नॅशनल पार्क मध्ये वाघ बघायला याल तेव्हा देवीचे दर्शनही घेणार ना…..

मनीषा पाटील

– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील. पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments