Monday, July 14, 2025
Homeसाहित्यईलो ईलो बाप्पा ईलो

ईलो ईलो बाप्पा ईलो

ऊन-पावसाचो लपंडाव,
खेळ सुरू होता ।
रंगीबेरंगी इंद्रधनुष,
आभाळात दिसता ।

वारंवार भास होता,
तुज्या चाहूलीचो ।
उद्या येतय,
निरोप गावता बाप्पाचो ।

आये नि बाबा,
गणपतीच्या सनाक ।
मी आनी बाप्पा,
इलव सगळी गावाक ।

अर्धीअधिक मुम्बय,
रीती झाली ।
कोकणातली कूटम्बा,
वरसकेक ईली ।

बाप्पाची मन्डपि,
तेरडयान सजली ।
मकरातल्या पाटार,
मूर्ती विराजली ।

मोठाले समयेत,
फुलवाती फुलले ।
बाप्पाच्या पायालगत,
उंदीरमामा बसले ।

गोंडयांच्या हारानी,
गणपती सजले ।
आरतीच्या ताटातसून,
कापूर धूप दरवाळले ।

आरतीच्या जोशात,
टाळ मुर्दुग गराजले ।
घंटीच्या सुरात,
भक्तजन डूलले ।

फुलांच्या सजावटीत,
आरास मांडलो फळांचो ।
चांदीच्या ताटात,
प्रसाद लाडू मोदकांचो ।

डोळो मिटून हात जोडून,
गार्हाना घातला देवाक,
आम्बो काजू पावस पानी,
हिरव्यागार ठेव कोकणाक ।

वर्षा भाबल.

— रचना : सौ. वर्षा महेंद्र भाबल.
— संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments