आज ऋषिपंचमी आहे. त्या निमित्ताने ही कविता.
— संपादक.
ऋषिमुनींचे विश्वात मोठे योगदान
भारतीयांना त्यांचा वाटे अभिमान ।।ध्रु।।
व्यास सूत आर्यभट्टादि ऋषी अनेक
बहु शोध जनक विश्वाला वरदान ।।1।।
ऋषिमुळे जीवन बनले सुखावह
मानवासाठी त्यांचे चाले विद्याध्ययन ।।2।।
थोर गणिती अंतराळ संशोधक
संस्कृत स्तोत्रे रचली केले अध्यापन ।।3।।
लौकिकाला अलौकिकाची देत जाणीव
ऋषी जपती नियम ज्ञान विज्ञान ।।4।।
मंत्र यज्ञयाग उपासना आश्रम
ज्ञानसाधना अध्यात्म आहे ऋषींचे देन ।।5।।
चार वेदांनी विश्वाला दिली दृष्टी ज्ञान
मानवाने सदा स्मरावे ऋषींचे ऋण ।।6।।

— काव्य : अरुण गांगल. कर्जत – रायगड
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800