ओंजळीतील पाण्याला पकडता आले तर बघ l
दुसर्याला ओंजळीने पाणी पाजता आले तर बघ।
निसटलेल्या क्षणांना मागे फिरवता आले तर पहा l
पुढे निघून गेलेल्या काळाला मागे परतवता येते कां बघ।
मूठीतुन निसटून गेलेली वाळूगोळा करता आली तर बघ l
पाण्यावर मारलेल्या रेघा मोजता आल्या तर पहा।
काळोखातल्या काजव्यांना धरता आले तर बघ l
सूर्य किरणांना अंधारात लपवून तर एकदा बघ।
कोसळत्या धबधब्याला बांध घालून तर बघ l
पुढे वाहत्या नदीला मागे फिरवून तर एकदा पहा।
फुल पाखरासारखे आनंदी राहून तर नित्य पहा l
सतत रडगाणे गाण्यापेक्षा दुसऱ्याचे अश्रू पुसून तर बघ।
सतत मागील अपमानाचा पाढा न वाचता मान देऊन तर बघ l
जिंकणे म्हणजे काय असते, कळले हरण्याचे दुःख सोसून बघ।
स्वतःसाठी खूपच मिळविले ना, आता दुसर् यांना देऊन पहा l
पैशाच्या मागे खूपच धावलास आयुष्य समाधानात जगून बघ।
तू नक्कीच हे एकदा तरी करून बघ l

– रचना : स्वप्नगंधा सतीश. विरार