Home बातम्या एड्स दिन : विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

एड्स दिन : विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

1

जागतिक एड्स दिना निमित्त, प्रसाद चिकित्सा स्वयंसेवी संस्थे मार्फत शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन या वर्षी देखील करण्यात आले होते. या कार्यक्रमांना विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज आश्रम शाळा, भिवाळी येथील विदयार्थ्यांसाठी माहिती सत्राच्या आयोजनाद्वारे करण्यात आली. सत्रादरम्यान संस्थेच्या डॉ. तनुजा यांनी विद्यार्थ्याशी संवाद साधला व त्यांना एच. आय. व्ही. चा प्रसाराची कारणे, एड्सची लक्षणे, प्रतिबंध व उपचार या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मुलांचे प्रश्न व शंकाचे सुद्धा डॉक्टरांनी सोप्या भाषेत निरसन केले.

या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या विदयार्थ्यांनी बसवेलेली नाटिका सादर करण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. सुमारे १५० विदयार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

दुसरा कार्यक्रम वज्रेश्वरी येथील महाविदयालयीन तरुण-तरुणींसाठी आयोजित करण्यात आला होता. येथे सुद्धा एच. आय. व्ही. एड्स या विषयावर माहिती सत्र पार पडले. सत्रादरम्यान उपस्थितांना विषयाची सखोल माहिती दिली गेलीच पण त्याचबरोबर त्यांच्या मनात असलेल्या शंका व चुकीच्या समजुतीचे सुद्धा डॉक्टरांनी निरसन केले.

कार्यक्रमात पोस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. उत्कृष्ट स्पर्धकांना बिक्षीसे वाटण्यात आली. कार्यक्रमात इयत्ता अकरावी व बारावीच्या सुमारे ५०० विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

दोन्ही शिक्षण संस्थांनी प्रसाद चिकित्साने उत्कृष्टरित्या कार्यक्रमाचे आयोजन करुन ग्रामिण विदयार्थ्यांना शिकण्याची संधी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

गेल्या दोन दशकांपासून संस्था एच. आय. व्ही. एड्स या विषयावर अविरतपणे काम करत असून या क्षेत्रात काम करणारी उत्कृष्ट संस्था म्हणून शासनाकडून गौरव प्राप्त झालेला आहे. संस्थेच्या गणेशपुरी स्थित दवाखान्यात एच.आय.व्ही. ची रक्त चाचणी, समुपदेशन, रुग्णाची रोगप्रतिबंधक शक्ती वाढवणारी औषधे (A.R.T.) इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version