Saturday, March 15, 2025
Homeसाहित्यएव्हढे मात्र खरे

एव्हढे मात्र खरे

अलिकडे तू, पाठवलास
चित्रातला कृत्रिम पाऊस
मुसळधार शुभेच्छा इ,
आणि मी विचारले मनाला

खरंच का आपण, भिजलो होतो
कधी ओल्याचिंब पावसात ?
असले भाबडे प्रश्न तुला
कधी पडतात कां ?

की सारं काही जाणवूनसुध्दा
कोरडेपणाचा बनाव करु लागलीस,
हल्ली काही कळेनासं झालय
निसर्ग आणि माणूस
बेशिस्त वागू लागलाय
एवढे मात्र खरं………!

– रचना : सुरेखा पाटील
– संपादन : सौ अलका भुजबळ

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments