काहीही ऐकून घ्यायचे
मला जमणार नाही
माझ्याशिवाय तुमचं
काहीही चालणार नाही
मला नाईलाजाने
ठेवल्या शिवाय
तुम्ही मला काही
खाली ठेवणार नाही.
मी तर हवा हवासा
पण मी नकोसा नकोसा
पण असं कसं…?
खाली ठेवता न ठेवता..
येता जाता सारखं
मला न्याहाळत असता
चैन तर पडत नाही
स्वस्थ ही बसवत नाही.
उलट मलाच म्हणता
लावलंय तू वेड
मी लावलंय का
तुम्हाला वेड..?
मी कुठे येतो
तुमच्या पाठी पाठी
तुम्हीच लागता
माझ्या पाठी पाठी
मला निवांत
बसू देत नाही
कुठे मी दिसेनासा झालो
जीव होतो कासावीस
मानत नाही तुम्ही
मीच आहे
तुमच्या आयुष्यातील
मौल्यवान पीस
कधीतरी माना मला
मान सन्मान द्या
किती ‘ऍप’ अपलोड करता
किती भार झेलू मी
चालतं का माझ्याशिवाय
कधी मला
पडताळून तर पहा
छान छान गाणी मी ऐकवतो
चांगलं चांगले व्हिडिओ मी दाखवतो
प्रवासाचं बुकींग
मीच करतो
तुमचं शाॅपीग
पण मीच करतो
मीच व्यवहार करतो
मीच पेमेंट करतो
फोटोही मीच काढतो
व्हिडिओ जपून ठेवतो
चविष्ट रेसिपी माझ्याकडूनच शिकता
तुमचे छान छान ग्रुप मीच बनवितो
तुमच्या भेटी गाठी
मीच ठरवतो
सागां ना, मी काय नाही करतो ?
मला चव, गंध कळत नाही
म्हणून बरं…
नाहीतर चक्क
एकएक पदार्थ
टेस्ट करायला लावले असते तुम्ही.
मीच घरी पोहचवतो छान छान स्नॅक्स
हवी ती माहिती चुटकीसरशी देतो.
कुठे जायचयं
मीच मार्ग दाखवतो.
मीच तुमची मैत्रिण
मीच तुमचा सखा
तुमच्या दिमतीला
मी सतत उभा
कधी तरी करा
माझा विचार..
घेऊन बसू नका
मला सदा
मोकळीक हवी
थोडी मला
द्या तुमच्या
डोळ्यांनाही आराम
मी पण पकतो
मी पण थकतो
नाहीतर ओव्हरलोड
मीच होईन
सगळच कसं
ठप्प होईन
सांभाळा मला
जपूनच वापरा
मला मेन्टेन करा
कमीच खायला घाला
मी ठणठणीत तर
तुम्ही पण ठणठणीत
उगाचच अपलोड
करू नका काही
काम झाले की
डिलीट करा
नाही होणार
मी हँग
मी सर्वार्थाने
आहे स्मार्ट
शिका माझ्यातील
नवनवीन आर्ट
मी आहे
तुमच्याच मुठीत
तरी आहे स्मार्ट,
मला तुम्हालाच कराचंय स्मार्ट.
प्रेमाने मला सांभाळा
मी तुमच्या जवळ फार
ह्रदयाशी नका घेऊ
जवळ फार फार
ओळखलं ना मला ?
तुमच्या हातातला
मी मोबाईल महान
मी मोबाईल महान

– रचना : पूर्णिमानंद
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800