Homeसाहित्यकशी धजावेल जिव्हा

कशी धजावेल जिव्हा

नाही राखत लज्जा कृष्ण,
द्रौपदीचे होता वस्त्रहरण
सीतेच्या अपहरणासाठी टपले
कपटी, मायावी रावण
माणसांच्या जंगलात लागे, भय मनामध्ये दाटायला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला

सख्यासंगती सप्तपदी, गृहलक्ष्मीचा मान
गृहिणी असो वा कमावती, पदोपदी अपमान
जाचक बंधनांच्या बेड्या, काय अर्थ स्वातंत्र्याला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला

दुय्यम स्थान सतत तिज, स्त्री-भृणहत्त्या सर्रास
शीलाचा बाजार मांडणे, लांच्छनास्पद समाजास
जरी स्वतंत्र झाला भारत, पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीसला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला

पुराणातील, इतिहासातील, गाऊ स्त्रियांची महती
वर्तमानातही सर्वच क्षेत्री, घेती भरारी स्त्रिया किती
तिच्या जगण्याची दुसरी बाजू, जेव्हा लागते पीडायला
कशी धजावेल जिव्हा, बाईपण भारी म्हणायला

भारती महाजन-रायबागकर

— रचना : भारती महाजन-रायबागकर. चेन्नई
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

कवयित्री आशा दळवी ,फलटण , सातारा on “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज”
मृदुला राजे on पुस्तक परिचय
डॉ. आलोक जत्राटकर on झेप : 21
Sardesai Samir on झेप : 21
Pratibha Saraph on झेप : 21
सुबोध अनंत जोशी. on माझी जीवन नौका : ६
सौ.सीमा दत्तात्रय आठवले on माझी जीवन नौका : ६