Homeसाहित्यकोणी सांगावा धाडला….

कोणी सांगावा धाडला….

कोणी सांगावा धाडला
आली धावुनी मुंगी बाय
तिले लागला हो सुगावा
म्हणती साखरदाणा हाय

कशा वारुळातून धावती
वेगे वेगे तिच्या हो सया
एका कणासाठी जीवाले
संकटी टाकते ग ही बया

काय जादू र देवा तुझी
देऊन टाकले तू वरदान
इवलुसा जीव धावतोया
एका पोटापायी रानरान

काय सांगायची कहाणी
असे जीवा जगणं मरण
मुठभर कणासाठी तवा
लेकरांची ओंजळ भरण

असा जीव घेई आभाया
अपुल्याच हो डोईवरती
दिन रात कष्ट करोनी व्हं
सुखाची घागर तवा भरती

माधवी ढवळे

— रचना : माधवी प्रसाद ढवळे. राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️c9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments