भारतातील सर्वात पहिला म्हणुन पुणे जिल्ह्य़ातील उरुळी कांचन येथील निसर्गोपचार आश्रम ओळखला जातो. महात्मा गांधी यांनी 1946 साली या आश्रमाची स्थापना केली.

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ;भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या “आरोग्यदायी जीवनासाठी योग” या संकल्पनेनुसार या आश्रमाने महिनाभर व्यापक आरोग्य जनजागृती अभियान राबवले. जीवनशैलीजन्य आजार वाढत असताना योगाचा प्रतिबंधात्मक आणि जीवनशैली आधारित आरोग्यदृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
योगाच्या प्रसारासाठी आश्रमाच्या कार्याची दखल घेत त्यांना आंतर-मंत्रालयीन बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले, जिथे राष्ट्रीय व जागतिक स्तरावर योगाचा प्रसार कसा करावा यावर मार्गदर्शन करण्यात आले.
या अभियानांतर्गत एकूण 16 विविध योग व आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यामुळे १८,००० हून अधिक लोकांपर्यंत आरोग्याचे संदेश पोहोचविण्याचे मोठे कार्य झाले. यामध्ये ताय ची, हस्त योग, कर्मचारी वर्गासाठी चेअर योग, RSB समूहासाठी डेस्कटॉप योग, ७ दिवसीय व्याख्यानमाला तसेच साउंड मेडिटेशन सत्रे यांचा समावेश होता.
दौंड, पेठ, तांबे वस्ती, SRC केमिकल्स, बोरीआंडी, झेड.पी. शाळा हिंगणगाव, ग्लोबल व्हिजन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (वडेबोलाई), एंजल स्कूल, महात्मा गांधी स्कूल, अस्मिता इंग्लिश मीडियम स्कूल, सायरस पूनावाला स्कूल, उन्नती कन्याशाळा, स्वामी विवेकानंद स्कूल तसेच श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना येथे योग शिबिरे व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
या सर्व उपक्रमांचा समारोप २१ जून रोजी आयोजित “योग संगम” या भव्य कार्यक्रमाने झाला.
या संपूर्ण अभियानाचे समन्वयन डॉ. समृद्धी व्यास यांनी केले. तसेच डॉ. भगवती मुखेडकर, श्री जलींदर वाडेकर, तुषार जगदाळे आणि राहुल मेमाणे या योगाचार्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमात बोलताना डॉ. अभिषेक देविकार, संचालक व विश्वस्त सचिव यांनी निरोगी वृद्धत्वासाठी योगाचे वैज्ञानिक महत्त्व स्पष्ट केले. वाढत्या जीवनशैलीजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर साधे योगाभ्यासही मोठा फरक घडवू शकतात, असे सांगत त्यांनी “योग ३६५” ही संकल्पना अंगीकारण्याचे आवाहन केले.
या उपक्रमांना डॉ. अमेय पुष्पराज व वैद्यकीय टीमचे सहकार्य लाभले. तसेच श्री शंकर चौधरी (एचआर) आणि श्री सतीश सोनामणे (प्रशासकीय अधिकारी) यांनी आयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
डॉ. नारायण हेगडे, व्यवस्थापकीय विश्वस्त यांनी संपूर्ण टीमला प्रोत्साहन देत मानसिक आरोग्याच्या जपणुकीवर विशेष भर दिला.

याच प्रसंगी “नो गॅस डे” हा नवीन उपक्रमही निसर्गोपचार आश्रम आणि Dietos यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. या अंतर्गत दर महिन्याला किमान दोन दिवस गॅसचा वापर टाळून नैसर्गिक, न शिजवलेला आहार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुक नागरिक QR कोड स्कॅन करून किंवा आश्रमाच्या संकेतस्थळाद्वारे संकल्प घेऊ शकतात. येथे फळे, भाज्या व विविध पौष्टिक पदार्थांवर आधारित नवीन, आरोग्यदायी व पर्यावरणपूरक रेसिपीज उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून आरोग्य संवर्धनासोबतच LPG बचत व पर्यावरण संरक्षणास हातभार लागणार आहे.
या व्यापक उपक्रमातून निसर्गोपचार आश्रमाने योग हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनविण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला आहे.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
