स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्याने अक्षरमंच प्रकाशन आणि हायमीडिया लॅबोरेटरी यांचे वतीने ७५ क्रांतीकारकांची माहिती असलेल्या ‘क्रांतीगाथा स्वातंत्र्याची‘ या पुस्तकाचे अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी प्रकाशन करण्यात आले.
केवळ दोन आठवड्याच्या काळात या पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली असून २५००० हून अधिक वाचकांकडून या पुस्तकाचे स्वागत करण्यात आले आहे. हे पुस्तक छापील, ई आवृत्ती आणि ऑडियो (अभिवाचन) आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.
या पुस्तकाच्या निर्मितीबद्दल आणि त्यावर आधारित विनामूल्य उपक्रमाबद्दल साहित्यगौरव संस्था, पुणे यांच्या वतीने संपादक डॉ गंगाधर वारके, कार्यकारी संपादक डॉ योगेश जोशी आणि हेमंत नेहते यांना साहित्यिक डॉ मधुसूदन घाणेकर यांचे हस्ते
‘संपादनगौरव‘, आनंदश्री फाउंडेशनच्या वतीने व सुप्रसिद्ध अभिनेते रझा मुराद यांच्या हस्ते ‘भारत गौरव‘, ओ.एम.जी. बुक चे संस्थापक संपादक प्रा. डॉ दिनेश गुप्ता यांच्या हस्ते ‘अमृत गौरव‘ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
“क्रांतीगाथा स्वातंत्र्याची” या पुस्तकाच्या तिहेरी यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
या पुस्तकाची ई आवृत्ती विनामूल्य उपलब्ध असून, ज्यांना ही आवृत्ती आणि उपक्रमाविषयी अधिक माहिती हवी आहे, त्यांनी ९७५७०७७६१४ / ८७७९६४४९९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लेखक आणि प्रकाशक यांनी केले आहे.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
