Saturday, January 31, 2026
Homeसाहित्यगगनभरारी : दोन प्रतिक्रिया

गगनभरारी : दोन प्रतिक्रिया

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळविलेल्या 26 महिलांच्या यशकथा देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आणि भरारी प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची सुंदर प्रस्तावना लाभलेल्या “गगनभरारी” पुस्तकात आहेत. नुकत्याच या पुस्तकावर प्राप्त झालेल्या दोन बोलक्या प्रतिक्रिया पुढे देत आहे. या दोन्ही महिला वाचकांचे मनःपूर्वक आभार.
— संपादक

1) प्रतिकूल परिस्थितीशी झगडत स्वतःचे अस्तित्व निर्माण करणाऱ्या तसेच स्वतः बरोबरच समाजासाठीही जगणाऱ्या सर्व स्त्रियांना देवेंद्र भुजबळ यांनी त्यांचे ‘गगन भरारी’ हे पुस्तक अर्पण केले आहे. एका समूहावर या पुस्तकाचे नाव पाहून मी ते लगेच मागून घेतले. या पुस्तकाबरोबर मी अजून दोनतीन पुस्तकेही मागवली आहेत.

‘गगन भरारी’ हे पुस्तक मी दोन दिवसात वाचून काढले. खरंच हे खूप छान पुस्तक आहे. सुशिलाबाई साबळे या अशिक्षित असूनही कचरा वेचता वेचता त्यांनी कशी गगन भरारी घेतली ही खरंच विचार करण्याची गोष्ट आहे.

एक स्त्री असूनही चिंपांझीप्रेमी जेन माकडाचा अभ्यास करण्यासाठी जंगलात राहू लागली. तिची निष्ठा, धाडस चिकाटी, संशोधन करण्याची वृत्ती यामुळे साधी डिग्री नसलेल्या जेनला पीएचडी मिळते ती गोम्ब स्ट्रीम रिसर्च सेंटरची संचालक बनते आणि एक परिपूर्ण संशोधन केंद्र उभे करते, ही तिची अद्वितीय भरारी. वाचून मन भारावून गेले.

एचआयव्ही ग्रस्त मातांना दिलासा देणाऱ्या डॉक्टर रेखा डावर, काव्यलता श्रीमती लता गुठे, क्रांतीज्योत बेबीताई गायकवाड, या सर्वांचेच कार्य अद्वितीय असे आहे. वैद्य शारदा महाडूंगे यांनी लोकांपर्यंत गर्भ संस्काराचे महत्त्व पटवून देण्यासाठी, योग्य आहार घेण्याचे महत्त्व यावर आहारवेद हे पुस्तक तयार केले आहे . खरंच हे कार्य खूप अतुलनीय आहे.

मानसी चेऊलकर यांनी सध्याच्या परिस्थितीची गरज ओळखून माय फार्म ही संकल्पना अस्तित्वात आणली आणि आज पर्यटकांचे मन जिंकले.

सुजाताची नवी वाट, या लेखात सुजाताचा अपघात होऊन दुसऱ्यावर विसंबून न राहता स्वतः शारीरिक मानसिक कौटुंबिक आर्थिक अडचणीवर मात करून ती उभा राहिली .

दुसरी सुजाता अंधत्वावावर मात करीत ब्रेल लिपी शिकली, शिक्षण घेतले, परीक्षा दिल्या व आपली वाट प्रकाशाकडे नेली, असा तिचा खूपच प्रेरणादायी प्रवास आहे.

शितल जोशी या एक महिला असूनही इस्टेट एजंट मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय समजून घेऊन त्या त्याकडे ओढल्या गेल्या. परिस्थिती ही माणसाकडून सगळं करून घेत असते. आपोआप सर्व गणितजमून जाते. खरंच व्यवसाय कोणताही असो जिद्द चिकाटी कष्ट करण्याची तयारी असेल तर यश नक्कीच मिळते.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानसिक तज्ञांची खूप आवश्यकता आहे. आज कोणी कोणाशी संबंध ठेवत नाही त्यामुळे डिप्रेशन, कामाचा ताण, घरातील वाद यासाठी मानसोपचार तज्ञ यांची मदत घेणे कसे आवश्यक आहे, हे मानसरोगतज्ञ डॉक्टर नीलम मुळे यांच्या कहाणीतून कळते .

वृत्तपत्र सृष्टीतही स्त्री आता मागे नाही. शोभा जयपुरकर, शीला उंबरे यांनी आपल्या कष्टाने आपला ठसा उमटवला आहे. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन आशाताई कामात व प्रतिभा सेन गुप्ता या अंधांसाठी शाळा चालवत आहेत खरंच त्यांचे अप्रतिम कार्य आहे.

“गगन भरारी” माननीय देवेंद्र भुजबळ द्वारा लिखित हे प्रेरणादायी पुस्तक वाचण्याचे भाग्य मला मिळाले, मी भुजबळ दादाची खूप आभारी आहे.

प्रा.अनिसा शेख

— लेखन : अनिसा सिकंदर शेख. दौंड

मधु मंगेश कर्णिक

2) अभिप्राय : – गगन भरारीचा !!

दुसऱ्याचे विशेष गुण, सत्कार्य, समाजोपयोगी ध्येय कष्ट, तळमळ ओळखून त्यावर प्रकाश टाकून इतरांच्या मनात त्या प्रकाशित ज्योतीचा प्रकाश उत्पन्न करण्याचा प्रांजळ पणे प्रयत्न करणे, वाचकांच्या मनात त्या व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रकाशाची अनुभूती घेऊन आपण त्या व्यक्तीचा आदर्श घ्यावा हे वाचकांच्या मनात उत्पन्न करणे हे सोपे नाही !

श्री देवेंद्र सरांचे “गगन भरारी” हे २६ हिरकण्यांचे विविध पैलू मनास ऊर्जा देतात ! त्या हिरकण्यांचे कार्य, परिस्थितीशी मुकाबला करत ध्येय गाठण्याची तळमळ तपस्या थक्क करते .

गगन भरारी हे पुस्तक सर्व अगदी रंजल्या गांजलेल्या ही प्रचंड ऊर्जा देऊन जीवनातील अनेक आव्हाने पेलण्यास झेलण्यास आणि निभावयास मार्गदर्शन करतील ! असे पुस्तक सरांच्या लेखणीतून आले !! त्या बद्दल त्यांना धन्यवाद !!

— लेखन : श्रीमती अलका मोहोळकर. पंढरपूर.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ +91 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Anil Deodhar on झेप : 9
Vinod Ganatra on झेप : 9